Rashmika's first look poster from 'Sita Ramam' out: सीता रमण चित्रपटातील रश्मिकाचं फर्स्ट लूक पोस्टर चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika's first look poster from 'Sita Ramam' out

Rashmika's first look poster from 'Sita Ramam' out: सीता रमण चित्रपटातील रश्मिकाचं फर्स्ट लूक पोस्टर चर्चेत

साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या येणाऱ्या आगामी चित्रपटातील रश्मिकाचं फर्स्ट लूक पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलच वायरल होतंय.ईद च्या शुभ मुहूर्तावर 'सीता रमण' या चित्रपटातील आफ्रिनच्या भूमिकेत दिसणाऱ्या रश्मिकाचं फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे.

दुलकर सलमानने रश्मिकाचं फर्स्ट लूक पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलंय.मुस्लिम महिलेच्या लूकमध्ये यावेळी रश्मिका 'आदाब' करतानाच्या पोजमध्ये दिसतेय.ईदच्या दिवशी रश्मिकाचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर करण्यात आलंय त्यामुळे चाहत्यांनीही कमेंट्सवर ईदच्या भरभरून शुभेच्छा दिल्यात.

या चित्रपटाचं दिग्दर्शन हानू रागवापुडी यांनी केलंय.हा एक रोमँटिक चित्रपट असून चित्रपटात मुख्य भूमिकेत समंथ कुमार आणि मृणाल ठाकूर दिसणार आहेत.हा चित्रपट ५ ऑगस्टला तेलगु,तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Rashmika Mandana First Look Poster From Sita Raman Is Out Now

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top