'पुष्पा'च्या श्रीवल्लीनं असं काय घातलं की लोक म्हणू लागले, 'अरे ही तर आपली उर्फी..'Rashmika Mandana Troll | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika Mandana Troll

Rashmika Mandana Troll: 'पुष्पा'च्या श्रीवल्लीनं असं काय घातलं की लोक म्हणू लागले, 'अरे ही तर आपली उर्फी..'

Rashmika Mandana Troll: 'रश्निका मंदाना साऊथची सुपरस्टार असण्यासोबतच नॅशनल क्रश देखील आहे. 'पुष्पा' सिनेमानंतर तर तिची पॉप्युलॅरिटी हिंदी सिनेप्रेमिकांमध्येही वाढलेली दिसत आहे.

नुकतीच ती एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती..जिथे तिनं ब्लॅक ड्रेस घातला होता. आणि तिच्यावर ट्रोलर्सनी निशाणा साधला. लोंकाना आपल्या फेव्हरेट श्रीवल्लीचा लूक जरादेखील आवडला नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रश्निकाच्या व्हिडीओवर लोक उर्फी जावेदपासून प्रेरणा घेतलीस का असा प्रश्न अभिनेत्रीला विचारताना दिसत आहेत.(Rashmika Mandana Troll because of her outfit video viral )

रश्मिका मंदाना 'पुष्पा' सिनेमात श्रीवल्लीची भूमिका साकारल्यानंतर हिंदी प्रेक्षकांमध्ये भलतीच प्रसिद्ध झाली आहे, लोकांना तिचा तो सिनेमा आणि तिची भूमिका खूपच आवडली होती. पण नुकतंच तिच्या एका आऊटफिटवर मात्र निगेटिव्ह कमेंट्स येताना दिसत आहेत.

रश्मिकाने ब्लॅक ड्रेस घातला होता ज्याचा वरचा आणि खालचा भाग खूपच पारदर्शक होता. तिनं खूश होत त्या ड्रेसमध्ये पापाराझीला पोझेस दिल्या. पण तो व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक अभिनेत्रीला ट्रोल करू लागले.

हेही वाचा: डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

यावर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'काय झालंय या इंडस्ट्रीवाल्यांना,या सगळ्यांना बॉयकॉट करायला हवं. एवढं प्रसिद्ध असूनही यांना स्वतःला एक्सपोज करायची काय गरज आहे'.

तर एकानं लिहिलं आहे की,'हिला पण बॉलीवूडची हवा लागली वाटतं..फॅशनच्या नावाखाली काहीही कपडे घातलेत.जेवढा कपडा मागे मोकळा सोडलाय तेवढ्यात एक चादर बनली असती'.

तर एकानं चक्क उर्फी जावेदची उपमा रश्मिकाला देत म्हटलंय, 'उर्फीकडून शिकू नकोस.