कपड्यांवरनं किरकिर करणाऱ्या मिलिंदला सेटवर एकाच वाक्यात अशोक मामांनी केलेलं गपगार..वाचा किस्सा | Milind Gawali | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Gawali & Ashok Saraf

Milind Gawali: कपड्यांवरनं किरकिर करणाऱ्या मिलिंदला सेटवर एकाच वाक्यात अशोक मामांनी केलेलं गपगार..वाचा किस्सा

Milind Gawli: 'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारून सध्या मिलिंद गवळी भलताच फॉर्मात आलाय. अर्थात मिलिंद हा गेल्या अनेक वर्षांपासून जसा आहे तसाच दिसत आहे. फीट अॅन्ड फाईन.. वर्ष सरतायत पण मिलिंदचं वय मात्र वाढताना दिसत नाहीय.

मिलिंदनं याआधी अनेक मालिका, मराठी सिनेमे केलेयत. अर्थात त्याच्या काही हिंदी मालिकांमुळेही तो ओळखला जातो. मिलिंदने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत बऱ्यापैकी हिरोच्या भूमिकाच जास्त केल्यात.

खलनायक,ग्रे शेड भूमिका त्या मानानं कमी असाव्यात. पण त्याच्या 'आई कुठे काय करते' या मालिकेतील त्याची भूमिका भयानक राग लोकांना आणतेय हे मात्र विसरून चालणार नाही. असो..

सध्या इथे आपण बोलतोय ते त्याच्या एका पोस्टमुळे. या पोस्टमध्ये त्यानं अशोक सराफांचा उल्लेख करत आपल्या एका सवयीविषयी लिहिलं आहे. त्यांच्यामुळे म्हणे याची एक सवय कायमची बदलली...

चला जाणून घेऊया नेमकं कशाविषयी लिहिलं आहे मिलिंदने पोस्टमध्ये. (Milind Gawali Post Aai Kuthe Kay Karte Actor share ashok saraf memory)

मिलिंदनं आपली ती पोस्ट आपल्या कपड्यांच्या आवडीविषयी लिहिली आहे. मालिका-सिनेमात का करताना कपड्यावरुन कीरकीर करणारा मिलिंद गपगुमान कसं देतील ते घालायला लागला याचा एक किस्सा शेअर केला आहे.

मिलिंद गवळी म्हणाला,''Acceptance

लहानपणापासून आपण आपल्याबद्दल एक धारणा तयार करतो, अमुक अमुक गोष्टी आपल्याला आवडतात,

अमुक आवडतच नाही, लहानपणीच आपलं ठरलेलं असतं की या या भाज्या आपल्याला आवडतात या आवडत नाही, काहींना गोड आवडतं काहींना तिखट आवडतं, असंच आवडतं आपण असेच आहोत, माझे लहानपणी खाण्यापिण्याचे खूप नखरे होते, आणि आई होतीच माझे लाड पुरवायला, माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक केला जायचा, दहावीनंतर वडिलांनी मला नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाठवलं, पहिल्याच दिवशी ताटात जे जेवण आलं, माझ्याबरोबर अनेकांनी तोंडं वाकडी केली, थोडसं खाल्लं आणि ताटात अन्न टाकून उठलो, मेजर राठोड आले शांतपणे म्हणाले “ खाना पुरा खतम करो , एक दाना भी प्लेट मे नही बचना चाहिए” आणि आम्हाला बंदूक घेऊन मोठ्या ग्राउंडला दहा राऊंड मारायची शिक्षा''.

''त्या दिवसापासून आजपर्यंत खाण्यापिण्याचे माझे सगळे लाड नखरे संपले, ताटात जे येईल ते निमुटपणे खायचं नखरे करायचे नाहीत.

पण कपड्यांच्या बाबतीत माझे नखरे चालूच होते,

मला हे शोभतं , मला ते शोभत नाही , मी हे घालणार मी हे घालणार नाही , असं बरीच वर्ष चाललं होतं, हा रंग मला आवडतो हा रंग मला आवडत नाही,

अनेक वर्ष सिनेमांमध्ये मी माझे स्वतःचेच कपडे घेऊन जायचं कारण कपड्यांसाठी मराठी सिनेमाचं बजेट खूप कमी असायचं त्यामुळे त्यांचे साधे स्वस्तातले कपडे मला कधीच आवडले नाहीत,

ती माझी सवय अशोक सराफांमुळे मोडली, माझे कपड्यांचे नखरे बघून ते एक दिवस मला म्हणाले “प्रेक्षक कपडे नाही अभिनय बघतात अभिनयाकडे लक्ष दे, मी दोन झब्बा पायजमा वर hit सिनेमेकेले आहेत “ आणि

त्यानंतर सिनेमा असो सिरीयल असो मी मला जे कपडे ते देतील ते आजपर्यंत निमूटपणे घालत आलो.

पण वैयक्तिक जीवनात मला माझ्याच choice चे कपडे घालायला आवडायचे,

हेही वाचा: डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

''पण “ आई कुठे काय करते “ दरम्यान बरेचसे events केले. अनेक designers ने माझ्यासाठी costumes create केले . जे माझ्या comfort zone च्या पलीकडचे होते,

भोसला मिलिटरीतले मेजर राठोड सारखेच माझे डिझायनर आहेत, डिझायनर भाग्यश्री ,दर्शना शानबाग , प्रणिता तन्मय... अधिकाऱ्याने आणि हक्काने मला experiments करायला सांगतात...

Acceptance is very important , Experiment साठी तयार झाल्या

नंतर I’m enjoying this phase of life ,

Different colours which I wouldn’t have never ever tried .

NOW, I Find new colours of life.

Thank you so much for getting me out of my comfort zone''.