‘स्वराज्य जननी जिजामाता’ चे शीर्षकगीत गायिले देवरूखच्या कन्येने

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 August 2019

साडवली -  खासगी दूरदर्शन वाहिनीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेसाठी देवरूखच्या रसिका गानूला शीर्षकगीत गायनाची संधी मिळाली. देवरूख, संगमेश्वरसह जिल्ह्याचे हे यश आहे. याआधी रसिकाने दोन मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.

साडवली -  खासगी दूरदर्शन वाहिनीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेसाठी देवरूखच्या रसिका गानूला शीर्षकगीत गायनाची संधी मिळाली. देवरूख, संगमेश्वरसह जिल्ह्याचे हे यश आहे. याआधी रसिकाने दोन मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.

स्वराज्य जननी जिजामाता ही अभिनेते अमोल कोल्हे यांच्या जगदंबची निर्मिती आहे. या मोठ्या बॅनरखाली रसिकाला पार्श्वगायनाची संधी मिळाली हे विशेष आहे. या गीताचे कवी मंदार चोळकर असून, सत्यजित रानडे यांचे शीर्षक गीत आहे. सध्या ही सीरियल चांगली गाजते आहे.

देवरूखमधील ॲड. गिरीश गानू व स्वरदा गानू यांची रसिका ही कन्या. लहानपणापासूनच आईवडील दोघेही गायन क्षेत्रातील असल्याने संगीताचे बाळकडू रसिकाला मिळालेच होते. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर संगीताचे धडे गिरवल्यावर विविध ठिकाणच्या गीतगायन स्पर्धांमधून रसिकाने उत्तम यश मिळवले. २०१५ मध्ये सारेगामा स्पर्धेत तिने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले होते. त्यावेळी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी रसिकासाठी संगीत शिष्यवृत्ती जाहीर केली होती. रसिकाचा गायनाचा एक ग्रुप देश-विदेशांत गीत गायनाचे अनेक प्रयोग करत असतो. मराठी चित्रपटसृष्टीतही रसिकाने चांगली कामगिरी केली आहे. बंदिशाळा व पोस्टर गर्लसाठी तिने पार्श्वगायन केले आहे. तिचे दोन जिंगल्सही प्रसिद्ध झाले आहेत.
माझ्यावर टाकलेला 

विश्वास सार्थ ठरवणार
‘स्वराज्य जननी जिजामाता’सारखी मालिका मला मिळाली हे मी माझे भाग्य समजते. आई-वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे मी सांभाळू शकले, असे मत रसिकाने व्यक्त केले. सतत सराव, रियाज व तेवढीच मेहनत मी माझ्या गाण्यासाठी घेत आले, त्याचेच हे फळ आहे. संगीतकार सत्यजित रानडे व अभिनेते निर्माते अमोल कोल्हे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. देवरूखवासीयांचे आशीर्वाद सतत सोबत असल्याने हे यश मिळत आहे, असे रसिकाने नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rasika Ganoo sings title song of Swaraj Janani Jijamata