'..तेव्हापासून लोक लांबूनच हात दाखवतात'; 'रात्रीस खेळ चाले'मधल्या सरिताचा अनुभव | Ratris Khel Chale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Prajakta Wadaye

'..तेव्हापासून लोक लांबूनच हात दाखवतात'; 'रात्रीस खेळ चाले'मधल्या सरिताचा अनुभव

टेलिव्हिजनवरील 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेची तीन यशस्वी पर्व गाजली. तिसऱ्या पर्वानेदेखील प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखादेखील प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. यातील एक लक्षवेधी भूमिका म्हणजे सरिताची. अभिनेत्री प्राजक्ता वाड्ये (Prajakta Wadaye) ही भूमिका साकारतेय. सरिताच्या व्यक्तिरेखेचा प्रवास अगदी रंजक असून प्रेक्षकांनी या व्यक्तिरेखेला पसंती दर्शवली.

‘सरिता बोलता म्हणून तेचा ताँड दिसता’ त्याचप्रमाणे ‘गे बाय माझे…’ हे सरिताचे संवाद प्रेक्षकांच्या ओठावर रुळले आहेत. प्रेक्षकांचा या व्यक्तिरेखेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली, "मालिकेत सरिता फार बोलताना दिसते. सरिताची भूमिका जोवर सोशिक सून होती, तोवर लोकं आवर्जून भेट घेत असत. पण जसजशी सरिता या भूमिकेत बदल होत गेले, ती सोशिकतेतून जशी कजाग होत चालली तसतशी लोकं लांबूनच हात दाखवतात. पहिले अंदाज घेतात आणि मगच हाक मारतात. सोशिकतेतून बिनधास्तपणाकडे झालेला सरिताचा हा प्रवास अगदी रंजक आहे."

हेही वाचा: लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा 'जिगरी दोस्त'! अनेक वर्षं उलटली पण..

सरिता आणि प्राजक्तामध्ये काय फरक आहे असा प्रश्न विचारला असता तिने सांगितलं, "सरिता आणि प्राजक्ता रिअल लाइफमध्ये फार वेगळ्या आहेत. स्टोरी आिण रिअल लाइफ यात फरक असतोच. स्त्रियांनी सहन करत बसणं, नमतं घेणे या गोष्टी मला न पटणाऱ्या आहेत. स्त्रीला स्वत:चं मत असावं या विचारांची मी आहे. सोशिक सरितापेक्षा अन्याय सहन न करणारी सरिता माझ्याकडून मनापासून साकारली जाते."

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top