लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा 'जिगरी दोस्त'! अनेक वर्षं उलटली पण.. | Riteish Deshmukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Riteish Deshmukh with his friend

लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा 'जिगरी दोस्त'! अनेक वर्षं उलटली पण..

आयुष्यात कितीही यशाची शिखरं गाठली, कितीही मोठं नाव कमावलं तरी जो आपल्या मित्रांना कधीच विसरत नाही, तोच मैत्रीच्या नात्याशी एकनिष्ठ राहतो, असं म्हणतात. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा, कर्तृत्वाचा ठसा उमटविणारा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh). रितेशने अभिनेता म्हणून नाम कमावलं, मात्र आजही तो त्याच्या मित्रांना विसरलेला नाही. सोशल मीडियावरील नुकत्याच एका पोस्टवरून त्याने ही गोष्ट सिद्ध केली आणि यामुळेच सध्या त्याचं कौतुक होत आहे.

लातूरच्या बाभळगावमधील एका मित्रासोबतचा फोटो रितेशने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. प्रकाश इरेकर असं त्याच्या या मित्राचं नाव आहे. प्रकाशच्या वाढदिवसानिमित्त रितेशने त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा. हा बाभळगाव, लातूर या माझ्या गावातील खास मित्र. अनेक वर्षं उलटली, पण आमची मैत्री मात्र कायम आहे', असं रितेशने लिहिलं आहे. आयुष्यात आपण कितीही पुढे गेलो तरी काही मित्रांचं आपल्या आयुष्यातील स्थान अबाधित असतं, हेच रितेशने या पोस्टद्वारे सिद्ध केलं आहे.

हेही वाचा: नाद खुळा! 'पुष्पा'मधल्या 'श्रीवल्ली' गाण्याचं मराठमोळं व्हर्जन

रितेशच्या याच पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. आज रितेश त्याच्या कारकिर्दीत फार पुढे गेला. मात्र जिवाभावाच्या मित्रांना अजूनही विसरला नाही, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्याने लिहिलेल्या या पोस्टचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top