'रात्रीस खेळ चाले'मध्ये ट्विस्ट; यामुळे बसणार शेवंताच्या नवऱ्याला धक्का

वृत्तसंस्था
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सध्या महाराष्ट्रातील घरघरांत पाहिली जाणारी मराठी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले 2 ही आहे. या मालिकेत सध्या  ट्विस्ट आला आहे.

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील घरघरांत पाहिली जाणारी मराठी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले 2 ही आहे. या मालिकेत सध्या  ट्विस्ट आला आहे. या मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. शेवंताला अण्णांबरोबरचे संबंध तोडून टाकायचे आहेत. पण ते शक्य होत नाहीय. अण्णा पाटणकर तालुक्याला गेल्यावर तिच्या घरी येतात. शेवंता अण्णांवर रागावलेलीच आहे. इतक्यात अचानक पाटणकर येतो आणि त्याला अण्णा-शेवंताचे प्रेमसंबंध असल्याची शंका येते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Goa days !! #apurvanemlekar

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

दरम्यान, आता पुढच्या काही आठवड्यांमध्ये पाटणकर मुद्दाम मुंबईला जातोय म्हणून सांगून अण्णा आणि शेवंतावर पाळत ठेवतोय. त्यातच त्याला सुषमा त्याची मुलगी नसल्याचं कळतं. पाटणकर हादरून जातो. त्यातच अण्णा त्याला सांगतो की, तू कसा शेवंतासाठी योग्य नव्हतास. हे कळताच पाटणकरला धक्का बसतो. पाटणकर आत्महत्या करतो.

 

सध्या रात्रीस खेळ चाले मालिकेतली शेवंता हिची भूमिका खूप गाजते आहे. मालिकेत अण्णा आणि तिची केमिस्ट्री चांगलीच जुळलीय. शेवंताचं काम करणाऱ्या अपूर्वा नेमळेकरनं याआधीही मालिकांमध्ये काम केले आहे. पण सध्या तिची ही भूमिका खूप गाजते आहे. अपूर्वानं झी मराठीवरच आभास हा, एकापेक्षा एक जोडीचा मामला यात काम केलं होतं. झी युवावरच्या प्रेम हे मालिकेतही ती होती.

दरम्यान, कलर्सवरच्या तू माझा सांगातीमध्येही अपूर्वाची भूमिका होती. तर स्टार प्रवाहवरच्या आराधनामध्येही अपूर्वा होती. सिनेमांमध्ये इश्कवाला लव्ह आणि अगदी अलिकडचा अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरमध्येही ती होती. आलाय मोठा शहाणा, चोरीचा मामला ही नाटकंही तिनं केली.

दरम्यान, अपूर्वा मुंबईत दादरमधलीच. किंग जाॅर्ज स्कूलमध्ये शिक्षण आणि नंतर रुपारेलमधून तिनं बीएमएसचा कोर्स केला. अभिनयात शिरण्याआधी अपूर्वा बँकेत काम करत होती आणि वडिलांच्या मॅनेजमेंट कंपनीत काम करत होती.अपूर्वा ज्वेलरी डिझायनिंगही करायची. 2015मध्ये तिचा स्वत:चा अपूर्वा कलेक्शन ब्रँडही होता.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratris khel chale shevantas husband patankar got to know that sushama is not his daughter