esakal | रविना टंडन दिवाळीत घरापासून होती लांब, एकत्र पूजा करण्यासाठी केला असा जुगाड..
sakal

बोलून बातमी शोधा

raveena

काही सेलिब्रिटी घरापासून लांब सेटवर दिवाळी सेलिब्रेट करत आहेत. रविना टंडन शूटींगसाठी डलहौजीमध्ये आहे. तिथून तिने तिच्या चाहत्यांसाठी दिवाळी सेलिब्रेशन ची झलक दिली आहे.

रविना टंडन दिवाळीत घरापासून होती लांब, एकत्र पूजा करण्यासाठी केला असा जुगाड..

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड सेलिब्रिटींनी कोरोनाच्या काळात आता शुटींगला सुरुवात केली आहे. काही सेलिब्रिटी घरापासून लांब सेटवर दिवाळी सेलिब्रेट करत आहेत. रविना टंडन शूटींगसाठी डलहौजीमध्ये आहे. तिथून तिने तिच्या चाहत्यांसाठी दिवाळी सेलिब्रेशन ची झलक दिली आहे. रविनासोबत तिची मुलं राशा आणि रणबीर देखील आहेत. 

हे ही वाचा: एअरपोर्टवर कित्येक तास अडकली अभिनेत्री जुही चावला, व्हिडिओ शेअर करत म्हणाली ''लज्जास्पद अवस्था''  

अभिनेत्री रविना टंडनने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत लिहिलंय, आमची ऑनलाईन दिवाळी. हिमाचलमध्ये शूटींग करत होते आणि मुलं देखील दिवाळीची सुट्टी सेलिब्रेट करण्यासाठी माझ्यासोबत आले होते. पती आणि पालकांसोबत ऑनलाईन आरती करत आहे. साऊथ आफ्रिका आणि गोवा वाल्यांची आठवण येत आहे. 

याआधी रविना टंडनच्या वाढदिवशी तिचे पती अनिल थडानी तिला सरप्राईज देण्यासाठी दुबईला पोहोचले होते. त्यावेळी रविनाने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, बर्थडे नेहमी कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करण्यात आनंद असतो. मात्र यावेळी आम्ही कोरोनाच्या संकटामुळे काही प्लान केला नाही. याव्यतिरिक्त मला कामासाठी डलहौजीला देखील जायचं होतं आणि कुटुंबाची आठवण येत होती. तेव्हाच अनिलने मला मोठं सरप्राईज दिलं. सोबतंच टीममधल्या लोकांनीही माझा हा दिवस खास बनवला.    

raveena tandon celebrates diwali with family online from himachal