
यावेळी रविवारच्या एपिसोडमध्ये रवीन टंडन तिचा पहिला वहिला हिरो सलमान खानवर हक्क गाजवायला येणार आहे.
मुंबई- ख्रिसमसमुळे संपूर्ण देशात सेलिब्रेशनचं वातावरण आहे. २०२० हे वर्ष आता संपत आलं आहे. जगभरात सुरु असलेल्या या सरत्या वर्षाचं सेलिब्रेशन लोक आनंदाने करत आहेत. अशातंच टीव्ही मालिकांमध्ये देखील हे सेलिब्रेशन पाहायला मिळेल. 'बिग बॉस'च्या घरात देखील असंच काहीसं वातावरण आहे. यावेळी रविवारच्या एपिसोडमध्ये रवीन टंडन तिचा पहिला वहिला हिरो सलमान खानवर हक्क गाजवायला येणार आहे.
हे ही वाचा: अभिनेत्री अमीषा पटेलसमोर एअरलाईन स्टाफ
ख्रिसमसच्या निमित्ताने घरातील सदस्यांना पत्र लिहिले गेले आहेत. ही पत्र शोच्या स्पर्धकांसाठी त्यांच्या घरातल्यांनी पाठवलेली आहेत. असं दिसतंय की अशाप्रकारे हे गिफ्ट पाहिल्यानंतर घरातील स्पर्धक भावूक होतील आणि घरातील वातावरण काही वेळासाठी बदलेल. ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरात नाचगाण्यांचा देखील कार्यक्रम होणार असल्याचं कळतंय. हे सेलिब्रेशन आणखी उत्साहवर्धक होण्यासाठी विकेंडच्या वारमध्ये रविना टंडल धमाल करताना दिसणार आहे. शोच्या निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे.
Apne pehle hero ke saath #BiggBoss14 ke stage pe romance karne aa rahi hain @TandonRaveena.
Dekhiye unko Sunday raat 9 baje, #Colors par.Catch it before tv on @VootSelect.#BB14 #BiggBoss2020 @BeingSalmanKhan@PlayMPL #DaburDantRakshak @TRESemmeIndia @LotusHerbals pic.twitter.com/R6vNlZZz8n
— ColorsTV (@ColorsTV) December 25, 2020
प्रोमोमध्ये दिसून येतंय की स्पर्धक गार्डन एरियामध्ये नाचता गाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे घरातील पत्र वाचून भावूक होताना दिसतायेत. प्रेक्षकांसाठी ही एक ट्रीट आहे की घरातील सगळे रुसवे फुसवे विसरुन एकत्र दिसत आहेत. यावेळी खास गोष्ट म्हणजे रविवारी विकेंडच्या वार दिवशी २७ तारीख आहे. या दिवशी सलमानचा बर्थ डे देखील आहे. 'द खबरी'च्या रिपोर्टनुसार, रविवारी शोमध्ये रविना टंडनसोबत जॅकलीन फर्नांडिस, धर्मेश, शहनाज गिलदेखील घरात दिसतील.
raveena tandon is coming on bigg boss 14 the first title on the first hero salman khan