वयाच्या ४६ व्या वर्षी 'आजी' झालेल्या रविना टंडनचा अनुभव

"आजी हा शब्द ऐकताच डोळ्यांसमोर ७०-८० वर्षांची वृद्ध व्यक्ती येते."
raveena tandon
raveena tandon
Updated on

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री रविना टंडन Raveena Tandon आता आजी झाली आहे. रविनाने पूजा आणि छाया या दोन मुलींना Raveena Tandon daughters दत्तक घेतलं आणि या दोन्ही मुलींना लहान बाळ आहेत. त्यामुळे वयाच्या ४६ व्या वर्षीच रविना आजी झाली आहे. या अनुभवाबद्दल ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. (Raveena Tandon reacts to being called a nani at age 46)

'मिस मालिनी'ला दिलेल्या मुलाखतीत रविना म्हणाली, "आजी हा शब्द ऐकताच लोकांच्या डोळ्यांसमोर ७०-८० वर्षांची वृद्ध व्यक्ती येते. पण जेव्हा मी मुलींना दत्तक घेतलं होतं, तेव्हा मी २१ वर्षांची होते. दोघींपैकी मोठी मुलगी ही दत्तक घेताना ११ वर्षांची होती. आम्हा दोघींमध्ये ११ वर्षांचं अंतर आहे. तिच्या बाळासाठी मी आता आजी आहे, पण माझ्यात आणि माझ्या मुलीत मैत्रीचं नातं आहे."

raveena tandon
'या' कारणामुळे सुरेश वाडकरांनी नाकारलं होतं माधुरी दीक्षितचं स्थळ

मुलींना दत्तक घेण्याचा आयुष्यातला सर्वोत्कृष्ट निर्णय

"वयाच्या २१व्या वर्षी मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात मला काहीच गैर वाटत नव्हतं. माझ्या आयुष्यातला तो सर्वोत्कृष्ट निर्णय होता. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे. पण त्यावेळी अनेकजण माझ्या या निर्णयाविरोधात होते. माझ्याशी कोणी लग्न करणार नाही असं काहीजण म्हणाले. पण नशिबात जे लिहिलेलं असतं, ते घडल्याशिवाय राहत नाही", असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

रविवाने २००४ साली चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रविनाने दत्तक घेतलेल्या मुलींपैकी पूजा ही इव्हेंट मॅनजर आहे तर छाया एअर हॉस्टेस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com