रवीना टंडनच्या मराठी ट्विटने वेधलं लक्ष; प्रवीण तरडेंसाठी खास संदेश | Raveena Tandon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin Tarde and Raveena Tandon

रवीना टंडनच्या मराठी ट्विटने वेधलं लक्ष; प्रवीण तरडेंसाठी खास संदेश

'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) या मराठी चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपटाची चर्चा संपूर्ण कलाविश्वात होतेय. फक्त मराठी कलाकारच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाचा टीझर पाहून भारावले आहेत. एकीकडे 'बाहुबली' फेम प्रभासच्या पोस्टची चर्चा असतानाच आता रवीना टंडनच्या (Raveena Tandon) मराठीतील ट्विटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाचा टीझर शेअर करत रवीनाने मराठीत ट्विट केलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीने मराठी चित्रपटाला साथ दिल्याने नेटकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असा चारही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. (Sarsenapati Hambirrao Teaser)

रवीना टंडनचं ट्विट-

'प्रवीण तरडे आणि टीम सरसेनापती हंबीरराव.. या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा,' असं ट्विट तिने केलंय. 'मराठीत कधी दिसलं नाही असं काहीतरी, व्हीएफएक्स, भव्यदिव्य सेटने परिपूर्ण असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार', असं तरडे म्हणाले होते. त्यानुसार भव्यतेची झलक या टीझरमध्ये पहायला मिळते.

हेही वाचा: विशाल निकम जिंकणार 'बिग बॉस मराठी ३'ची ट्रॉफी?

हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची प्रविण तरडे यांनी घोषणा केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. याआधी प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं होतं.