Ravi Jadhav: "पालक म्हणून अभिमानाचा क्षण"; लेकासाठी रवी जाधव यांची खास पोस्ट

Ravi Jadhav: नुकतीच रवी जाधव यांनी त्यांच्या लेकासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Ravi Jadhav
Ravi Jadhav

Ravi Jadhav: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) हे त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकतात. रवी जाधव हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. नुकतीच रवी जाधव यांनी त्यांच्या लेकासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

रवी जाधव यांची पोस्ट

रवी जाधव यांनी त्यांचा मुलगा अथर्व जाधव याच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अथर्वचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "पालक म्हणून अभिमानाचा क्षण! माझ्या मुलाने नुकतीच OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजिटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) पदवी पूर्ण केली. आम्ही खूप आनंदी आहोत. त्याला उत्कृष्ट कामगिरी करताना आणि त्याचे ध्येय साध्य करताना पाहणे हा एक अविश्वसनीय प्रवास होता." रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी रवी जाधव यांच्या लेकाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अटल बिहारी वाजपेयी

अभिनेत्री रुजुता देशमुख, फुलवा खामकर, प्रसाद ओक यांनी रवी जाधवच्या पोस्टला कमेंट करुन अथर्वला शुभेच्छा दिल्या आहे.

रवी जाधव यांचे चित्रपट

रवी जाधव यांचा मैं अटल हूं हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी रवी जाधव यांची ताली ही वेब सीरिज रिलीज झाली. या वेब सीरिजचं अनेकांनी कौतुक केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com