काय आहे मोदींची 'अग्निपथ' योजना? अभिनेता रवि किशनच्या मुलीला पडली भुरळ Ravi kishan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Kishan's daughter Ishita Shukla to join 'Agneepath'!"

काय आहे मोदींची 'अग्निपथ' योजना? अभिनेता रवि किशनच्या मुलीला पडली भुरळ

मोदी सरकारनं (Modi Government)काही दिवसांपूर्वी सैन्यातील प्रवेशासाठी 'अग्निपथ'(Agneepath) नावाच्या योजनेची घोषणा केली,ज्या अंतर्गत देशातील तरुण मुलं ४ वर्ष सैन्यात सामिल होऊन देशाची सेवा करु शकतात. काही लोकांनी या योजनेची प्रशंसा केली तर बिहार पासून उत्तराखंड पर्यंत मात्र या योजनेचा विरोध होताना दिसून आला. यादरम्यान भोजपूरी सिनेमांचा अभिनेता रवी किशन(Ravi Kishan) यानं म्हटलं आहे की,त्याची मुलगी इशिता शुक्लाअग्निपथ योजनेच्या माध्यमातून सैन्यात जाण्याचा विचार करीत आहे.(Ravi Kishan's daughter Ishita Shukla to join 'Agneepath'!)

हेही वाचा: दयाबेन कुठेय?; 'तारक मेहता'चे निर्माते का करतायत सारवासारव...

रविकिशनने 'अग्निपथ' योजनेचं समर्थन करताना आपल्या मुलीचा एनसीसी चा ड्रेस घातलेला एक फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देत त्यानं लिहिलं आहे,''माझी मुलगी इशिता शुक्ला आज सकाळी बोलली,'' बाबा मी अग्निपथ योजनेच्या माध्यमातून सैन्यात जाऊ इच्छिते. मग मी ही तिला,बेटा तू जरुर जा असं म्हणत पाठिंबा दर्शविला''.

रवि किशन च्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. तर काहींनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे. काही ट्वीट्स तर फारच मजेदार आहेत. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून देशाचे तरुण नौसेना,हवाईदल(वायुसेना),आर्मी मध्ये ४-४ वर्ष कार्य करुन मातृभूमीची सेवा करु शकतात. रवि किशनची मुलगी इशिता शुक्लाने यावर्षी जानेवारी मध्ये झालेल्या एनसीसी च्या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. तिला त्यावेळी एडीजी पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं होतं.

हेही वाचा: सोनमच्या डोहाळे जेवणात दाढी,मिश्या अन् वन पीस घातलेला लिओ कल्याण कोण?

इशिता शुक्ला व्यतिरिक्त रवी किशनच्या आणखी दोन मुली आहेत. ज्यांची नावं रीवा किशन आणि प्रीती किशन आहे. रीवा एक अभिनेत्री आहे, रवी किशनचा एक मुलगा देखील आहे. ज्याचं नाव सक्षम आहे.

Web Title: Ravi Kishans Daughter Ishita Shukla To Join

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top