
Viral : 'दो तेरा दो मेरा !' जडेजानं अश्विनला घातला गंडा! ड्रेसिंग रूम मधला व्हिडिओ व्हायरल
Ravindra Jadeja R Ashwin funny viral funny video fans : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. यासगळ्यात तो व्हिडिओ जर क्रिकेटशी संबंधित असेल त्याच्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांची संख्या मोठी असते. सध्या प्रसिद्ध भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटपटू हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड करताना दिसतात. आयपीएल असो किंवा आणखी कोणत्याही प्रकारचे सामने त्यात सहभागी होताना बाकीच्या वेगवेगळ्या जाहिरातींमधून खेळाडू आपली छबी चाहत्यांमध्ये कशी राहिल याचा विचार करताना दिसतात. त्यात मोठमोठ्या खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे.
Also Read - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
प्रसिद्ध खेळाडू रोहित शर्मा असो वा रणमशिन विराट कोहलीच्या वेगवेगळ्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद आहे. विराट हा तर सोशल मीडियावर चाहतावर्ग असणारा खेळाडू आहे. इंस्टा असो वा ट्विटर यावर त्याला फॉलो करणाऱ्यां चाहत्यांची संख्या काही कमी नाही. यानंतर क्रमांक आहे तो रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांनी केलेल्या एका रिल्स किंवा व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद लाखोच्या घरात आहे.
आता रविंद्र जडेजा आणि आर अश्विनच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही जबरदस्त आहे. आतापर्यत या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंटसची संख्याही मोठी आहे. त्या व्हिडिओमध्ये रवी अश्विनला काही वस्तू देताना दिसतो आहे. तो जे मोजमाप करतो आहे त्यात तो स्वताला जास्त वस्तू घेतो आहे हे दिसते. पण ती गोष्ट काही अश्विनच्या लक्षात येत नाही.

तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी दोन्ही खेळाडूंना दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहेत. एकानं लिहिलं आहे की, अश्विन तुला रविंद्रनं वेडं बनवलं आहे. त्यानं स्वताला जास्त वस्तू घेतल्या आहेत. त्यामुळे तू त्याच्याशी भांडायला हवं. या प्रतिक्रियांनी लक्ष वेधून घेतले आहे.