Pathaan : "शाहरुख खान मुस्लिम नाही, त्याला मारून टाका, पण..." ; कोणी दिला इशारा?

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : प्रदर्शनापूर्वी चर्चेत असलेला पठाण प्रदर्शनानंतर देखील चर्चेत आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या 'पठाण'ने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. दररोज 'पठाण'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन झपाट्याने वाढत आहे. पठाणने ३०० कोटींच्चा टप्पा गाठला आहे.

दरम्यान मुंबईच्या रझा अकादमीच्या मौलवींचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. त्यांनी गंभीर इशारा दिला आहे. 

सध्या सुरू असलेल्या पठाण विवादादरम्यान रझा अकादमीचे मौलवी खलील-उर-रहमान यांनी 'शाहरुख खान मुस्लिम नाही, जा आणि त्याला मारून टाका' असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला जर चित्रपटाचा विरोध करायचा असले तर त्यांनी शाहरुखच्या घरी जावे आणि त्याला गोळी मारावी, असे मौलवी खलील-उर-रहमान म्हणाले. 

Shah Rukh Khan
Supriya sule on Pathan: 'शाहरुखचा हेवा...'राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही 'पठाण'ची भुरळ...

"शाहरुख खानला जे काही म्हणायचे आहे ते बोला, त्याच्यासोबत वाट्टेल ते करा पण तुम्ही आमचे प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द बोललात तर ते खपवून घेतले जाणार नाही," असा इशारा देखील मौलवींनी दिला आहे. 

Shah Rukh Khan
Sonam Wangchuk : "भिंतीवरून फेकले, माझा जीव गेला असता" ; लडाखसाठी लढणाऱ्या 'रँचो'चा गौप्यस्फोट!

"मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बजरंग दलाने पठाणला विरोध केला होता. यावेळी काही लोकांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. यानंतरच इंदूरमधील बडवाली चौकी आणि खजराना पोलीस स्टेशनच्या बाहेर इस्लामी समुदाय जमा झाला. त्यांनी घोषणा दिल्या. आम्ही पुन्हा सांगत आहोत, पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द खपवून घेतले जाणार नाहीत", असे मौलवी खलील-उर-रहमान यांनी सांगितले. 

Shah Rukh Khan
Adani Group : बँकांचे 80,000 कोटी रुपये बुडणार? अदानी ग्रुपला सर्वात जास्त कर्ज देणाऱ्या SBI चे मोठे वक्तव्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com