
Alia Bhatt Video: छा गयी! भर स्टेजवर रेखाजींनी आपला पुरस्कार आलियाला समर्पित केला आणि मग जे झालं..
Alia Bhatt News: आलिया भटला सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया भटला काहीच दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला. ज्येष्ठ अभिनेत्री रेखाच्या हस्ते आलियाला पुरस्कार मिळाला.
रेखा कायमच नवोदित कलाकारांचं कौतुक करताना दिसतात. त्यांच्या कामाची प्रशंसा करतात. अशातच रेखाजींनी आलिया सोबत दादासाहेब फाळके पुरस्कारात एक अशी गोष्ट केलीय ती चर्चेत आहे.
नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या अवॉर्ड इव्हेंटमधील व्हिडिओ क्लिपमध्ये आलिया आणि रेखा पांढऱ्या साड्यांमध्ये स्टेज शेअर करताना दिसत आहेत. रेखा स्टेजवर आली तेव्हा आलियाच्या हातात ट्रॉफी होती.
तेव्हा रेखाजी सर्वांसमोर आलियाला म्हणाल्या, "मी आजचा माझा पुरस्कार आपल्या देशातल्या भावी दिग्गजांना समर्पित करते आणि आलिया याची सुरुवात आहे." असं रेखाजी म्हणताच भारावून गेलेली आलिया जमिनीवर कोसळून “टूर्रर्रर्र” असा आवाज करत प्रतिक्रिया देते.
आलिया आणि रेखाजी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रेखाजी आणि आलिया यांचं हे प्रेमळ बॉण्डिंग सर्वांना आवडलं आहे.
काहीच दिवसांपूर्वी आलियाने इंस्टाग्रामवर बर्थडे पार्टीचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती केक कापताना आणि सेलिब्रेशन करताना दिसत आहे.
या खास प्रसंगी तिच्यासोबत तिच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती म्हणजेच रणबीर कपूर देखील होता. दोघांनीही चांगला वेळ घालवला आणि आलियाने तिचा 30 वा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला.
फोटोंमध्ये आलियाची रणबीर कपूरसोबतची जोडी खूपच खास दिसत आहे. रणबीरने आपले लांब केस बांधले असून त्याची स्टाइल पूर्णपणे वेगळी दिसते. बॉलिवूडचे हे कपल हसताना दिसत आहे. लग्नानंतर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलतात.
पती रणबीर कपूरच नाही तर आलिया भट्टनेही तिचा वाढदिवस तिची आई सोनी राजदानसोबत साजरा केला. याशिवाय तिने तिची धाकटी बहीण शाहीन भट्टसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. याशिवाय तिच्या सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये काही खास मित्रांचाही समावेश आहे.