Nagraj Manjule: ऑलीम्पिक विजेते खाशाबा जाधव आठवतायत का? नागराजच्या नव्या सिनेमाची पहिली झलक समोर

स्वतः नागराज यांनी फेसबुकवर याविषयी खुलासा केलाय.
Nagraj Manjule Upcoming Khashaba Jadhav Marathi Movie First Look Out
Nagraj Manjule Upcoming Khashaba Jadhav Marathi Movie First Look OutSAKAL

Khashaba Jadhav Marathi Movie First Look Out: नागराज मंजुळेंच्या आगामी खाशाबा जाधव सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. अखेर या सिनेमाची पहिली झलक समोर आलीय. स्वतः नागराज यांनी फेसबुकवर याविषयी खुलासा केलाय. नागराजचा सध्या घर, बंदूक, बिर्याणी सिनेमा बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसादात सुरु आहे

(Remember Olympic champion Khashaba Jadhav? The first glimpse of Nagaraj's new marathi movie khashaba is here)

Nagraj Manjule Upcoming Khashaba Jadhav Marathi Movie First Look Out
Elon Musk Twitter: एलन मस्कने फिरवली छडी.. दिग्गज सेलिब्रिटींचं ब्लु टिक घेतलं हिसकावून

नागराज मंजुळेंनी खुलासा केलाय की.. ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पैलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.

फँड्री,सैराट नंतर 'खाशाबा' हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय.

जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे.निखिल साने सर फँड्री पासून सोबत आहेतच.

हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल...! चांगभलं !

Nagraj Manjule Upcoming Khashaba Jadhav Marathi Movie First Look Out
Nagraj Manjule: नागराज मंजुळे यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला.. आता उघडकीस आली संपूर्ण घटना..

फँड्री, सैराट, नाळ, झुंड अशा चित्रपटांमधून मराठी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप उमटविणाऱ्या नागराज मंजुळेनी काहीच दिवसांपूर्वी मोठी घोषणा केली आहे.

नेहमीच सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या नागराजनं खाशाबा निमित्ताने मोठं शिवधनुष्य हाती घेतलं आहे.

तो आता ख्यातनाम पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण केवळ निर्मितीच नाही तर नागराज आता खाशाबा चं दिग्दर्शन सुद्धा करणार आहेत.

Nagraj Manjule Upcoming Khashaba Jadhav Marathi Movie First Look Out
Elon Musk Twitter: एलन मस्कने फिरवली छडी.. दिग्गज सेलिब्रिटींचं ब्लु टिक घेतलं हिसकावून

काहीच दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री निमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती.

यावेळी नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची घोषणा केली होती .

कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांचे व्यक्तिमत्व नागराज आता खाशाबा चित्रपटाच्या निमित्तानं लवकरच प्रेक्षकांसमोर आणणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com