रेमोच्या बायकोने 'अशा' प्रकारे केले वजन कमी

वृत्तसंस्था
Sunday, 7 July 2019

एक चॅलेंज कोरिओग्राफर आणि डायरेक्टर रेमो डिसूजाच्या पत्नीनं 7 महिन्यांपूर्वी घेतलं होतं आणि तिनं खूप मेहनत करून या सात महिन्यात स्वतःचं वजन कमी केलं. रेमोनं स्वतः याबाबत त्याच्या पत्नीचा फोटो शेअर करून माहिती दिली आहे.

मुंबई : सध्याच्या काळात फिट राहणं आजकाल सर्वांनाच आवडतं. पण त्यात करून तुमचा पार्टनर फिट असेल आणि तुम्ही फॅट असाल तर मात्र हे तुमच्यासाठी एक चॅलेंज ठरतं. असंच एक चॅलेंज कोरिओग्राफर आणि डायरेक्टर रेमो डिसूजाच्या पत्नीनं 7 महिन्यांपूर्वी घेतलं होतं आणि तिनं खूप मेहनत करून या सात महिन्यात स्वतःचं वजन कमी केलं. रेमोनं स्वतः याबाबत त्याच्या पत्नीचा फोटो शेअर करून माहिती दिली आहे.

रेमोनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याची पत्नी लिजेलचा एक कोलाज फोटो शेअर केला आहे. ज्यातील एका फोटो 7 महिन्यांपूर्वीचा आहे तर दुसरा फोटो आत्ताचा आहे. रेमोनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ही ती गोष्ट आहे ज्याला तुम्ही डेडिकेशन म्हणू शकता. मला तुझा अभिमान वाटतो. तु हे सिद्ध करून दाखवलंस की, IMPOSSIBLEचा अर्थ असतो I M POSSIBLE.
 

पुढे रेमोने म्हटले आहे की, अशीच मला नेहमी प्रेरणा देत राहा आणि प्रेम करत राहा. दरम्यान, रेमो आणि लिजलचं लव्ह मॅरेज असून ते एका डान्स ग्रुपमध्ये होते आणि बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होते. सुरुवातीला असलेली मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केलं. आता त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remo D'Souza shares a picture of his wife Lizelles amazing transformation