Renjusha Menon: प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू, मनोरंजन क्षेत्रावर शोककळा

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री रेंजुषा मेनन हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वांना धक्का बसलाय
Renjusha Menon Popular Malayalam TV serial actress  was found hanging in her rented apartment
Renjusha Menon Popular Malayalam TV serial actress was found hanging in her rented apartment SAKAL
Updated on

Renjusha Menon News: चित्रपट- मालिका क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री रेंजुषा मेनन श्रीकार्यम येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. 35 वर्षीय अभिनेत्रीच्या मृत्युने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय.

रेंजुषा हिच्या पश्चात वडील सीजी रवींद्रनाथ आणि आई उमादेवी असा परिवार आहे.

(Renjusha Menon Popular Malayalam TV serial actress was found hanging in her rented apartment)

Renjusha Menon Popular Malayalam TV serial actress  was found hanging in her rented apartment
Ashvini Mahangade: "तर तुमचं आडनाव मुल्ला - खान असतं", अश्विनी महांगडेने छत्रपती शिवरायांप्रती केलं ऋण व्यक्त

रेंजुषा हि ज्या घरात राहत होती ती खोली सकाळपासुन बराच वेळ बंद होती. पुढे खोलीचा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा रेंजुषा घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली. म्हणुन तिच्या आईने घातपाताचा संशय व्यक्त केलाय.

रेंजुषा मेननने मालिका आणि सिनेमात येण्यापूर्वी टीव्ही शो अँकर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. एका प्रख्यात मल्याळम वाहिनीवरील सेलिब्रिटी टीव्ही शोमध्ये स्पर्धक म्हणून तिला प्रथम ओळख मिळाली. (Latest Marathi News)

'स्त्री', 'निझलट्टम', 'मगलुदे अम्मा' आणि 'बालामणी' यांसारख्या मालिकांमधील रेंजुषाच्या अभिनयामुळे तिचे प्रत्येक घरात नाव झाले. नंतर तिने 'सिटी ऑफ गॉड', 'मेरीकुंडोरू कुंजाडू', 'बॉम्बे 12 मार्च', 'लिसम्मायुदे वीडू', 'कार्यस्थान', 'अथभूता द्विपू' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. रंजूषा ही एक व्यावसायिक भरतनाट्यम नृत्यांगना देखील होती.

मालिकांमध्ये लाइन प्रोड्यूसर म्हणूनही काम करणाऱ्या रेंजुषाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com