अभिनेता अमित साधचा धक्कादायक खुलासा, “मी चार वेळा आत्महत्या..”

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 23 November 2020

अमित त्याच्या मानसिक आरोग्याबाबत बोलला आहे. किशोरवयात असताना अमितने चक्क चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं त्याने म्हटलं आहे.  

मुंबई- ‘ब्रीद : इन्टू द शॅडो’ या वेब सीरिजमधील उत्तम अभिनयासाठी चर्चेत आलेला अभिनेता अमित साधने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.  अमित त्याच्या मानसिक आरोग्याबाबत बोलला आहे. किशोरवयात असताना अमितने चक्क चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं त्याने म्हटलं आहे.  

हे ही वाचा: कर्नाटक क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली रश्मिका मंदाना आता ठरलीये ‘नॅशनल क्रश’    

‘मेन्स एक्सपी’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “१६ ते १८ वर्षांच्या वयात मी स्वत: चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझ्या डोक्यात सतत आत्महत्येचा विचार नव्हता, काही प्लॅनिंग नव्हती. अचानकच माझी जगण्याची इच्छा निघून जायची. जेव्हा चौथ्यांदा प्रयत्न केला तेव्हा खरंच मनातून वाटलं की आपण असं जगू शकत नाही. आपला शेवट असा असू नये. तेव्हापासून माझी मानसिकता बदलली. काहीही झालं तरी हार मानू नये, असं मनाशी पक्कं ठरवलं आणि पुढचा प्रवास सुरू केला.”

जवळपास वीस वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर नैराश्य, चिडचिडेपणा, आत्महत्येचा विचार यांपासून मला मुक्तता मिळाल्याचं त्याने या मुलाखतीत सांगितलं.

‘काय पो चे’, ‘गुड्डू रंगीला’ यांसारख्या सिनेमांमध्ये त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. मालिकेतून करिअरची सुरुवात करणारा अमित साधची आता चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रियता आहे. 

report kai po che actor amit sadh attempted suicide four times  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: report kai po che actor amit sadh attempted suicide four times