esakal | 'ती माझी ऑफिशियल पार्टनर' केएल राहुलचे 'रिलेशनशिप' स्टेट्स
sakal

बोलून बातमी शोधा

kl rahul and athiya shetty

'ती माझी ऑफिशियल पार्टनर' केएल राहुलचे 'रिलेशनशिप' स्टेट्स

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड आणि क्रिकेट (bollywood and cricket) संघाचे जूने नाते राहिले आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी (bollywood celebrities) क्रिकेटमधल्या खेळांडूंशी संसार थाटल्याचे दिसून आले आहे. संगीता बिजलानी (sangeeta bijlani), नीना गुप्ता (neena gupta) यांचे त्यात नाव घ्यावे लागेल. यात नीना गुप्ता यांचा संसार फार काळ चालला नाही. सध्या भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक केएल राहुल (kl rahul) आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (athiya shetty) हिच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसते आहे. सध्या क्रिकेट आणि बॉलीवूड यांच्यातील आणखी काही उदाहरणं द्यायची झाल्यास, अनुष्का आणि विराट, हार्दिक-नताशा, युवराज -हेजल, भज्जी - गीता यांची नावे घेता येतील. (report kl rahul named athiya shetty as partner before tour of england yst88)

या यादीत राहुल आणि अथिया यांचीही नावं जोडली जाणार आहेत. अजून त्या दोघांनी अद्याप याबाबत कुठलाही खुलासा केला नसला तरी त्याबाबत राहुलनं एक पोस्ट शेयर केली आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यांचे नाते आता मैत्रीच्या पुढे गेल्याचीही चर्चा आहे. सध्या भारतीय संघ हा इंग्लंडमध्ये आहे. पुढच्या महिन्यात चार तारखेपासून टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. पाच सामन्यांची सिरिजही आहे. त्याची सुरुवात चार ऑगस्टपासून होणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं खेळाडूंना आपल्या पत्नी आणि परिवारातील सदस्यांना सोबत नेण्यास परवानगी दिली आहे.

सुत्रांनी माहिती दिली आहे की, केएल राहुल हा त्याची मैत्रीण अथिया शेट्टी हिला सोबत घेऊन गेला आहे. हिंदूस्थान टाईम्सनं ही बातमी दिली आहे. बीसीसीआयनं एक टूरचे आयोजन केले होते तेव्हा राहुलनं अथियाचा उल्लेख आपली पार्टनर असा केला होता. ज्यावेळी सगळे खेळाडू आणि त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींची नावे घेण्यात आली तेव्हा राहुलनं अथियाचे नाव पार्टनर म्हणून दिल्याचे दिसुन आले आहे.

हेही वाचा: 'आमचं घर म्हणजे,भांडणाचा अड्डा आहे का?' सलमान संतापला

आतापर्यत एका गोष्टीची चर्चा होत होती की, क्रिकेटर केएल राहुलनं अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टीच्या सोशल मीडियावर काही फोटो शेयर केले आहेत. त्यातून आपण अंदाज लावू शकतो की, ते दोघेही सध्या लंडनमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी अथियानं राहुल सोबत एक पोस्ट शेयर केली होती. त्यालाही तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.

loading image