'पौरशपूर पाहू नये अशी, निव्वळ भंपक; रटाळवाणी मालिका'

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

 मालिकेत ग्राफिक्स इतके दयनीय स्वरुपात दाखिवण्यात आले आहे की ही मालिका मोठ्या स्क्रीनवर पाहण्यापेक्षा मोबाईलवर पाहिलेली बरी असे वाटायला लागते. 

मुंबई - पौरुषपूर नावाचं राज्य. त्या राज्याचा राजा प्रचंड वासनांध, त्याला त्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. त्याच्या महालातून राण्यांचं गायब होणं म्हणजे काहीतरी गडबड आहे हे पहिल्या भागातच कळते. मात्र त्यापुढे या मालिकेनं रटाळपणाचा जो प्रकार सुरु केला आहे तो शेटपर्यत पाहवत नाही. अतिशृंगारिक करण्याच्या भरात मालिकेचा आशयच हरवून गेला आहे. ज्या प्रकारे मालिकेचा गवगवा झाला होता ते पाहता ही मालिका फारच भंपक वाटते.

16 व्या शतकातला सेट मालिकेत दाखवण्यात आला आहे. ग्राफिक्स इतके दयनीय स्वरुपात दाखिवण्यात आले आहे की ही मालिका मोठ्या स्क्रीनवर पाहण्यापेक्षा मोबाईलवर पाहिलेली बरी असे वाटायला लागते. पौरुषपूरच्या राज्यात महिलांना कोणतेही स्थान नाही. त्यांचे एकच काम म्हणजे पुरुषाची सेवा करणे, त्यात तिनं चूक केली की तिचा शाररीक, मानसिक छळ करणे असा प्रकार सुरु होतो. तिला कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही. यात कहर म्हणजे आपला मालकी हक्क दाखविण्यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीनं तिला 'कुलूपात' बंद करुन ठेवलं आहे.

पौरशपूरचं राज्य भद्र प्रताप सिंह याच्या हातात आहे. तो सतत कामातूर असलेला राजा आहे. त्याच्यासाठी स्त्री केवळ उपभोग्य वस्तु आहे. आपल्या सुखासाठी तो तिच्याशी कुठल्याही पातळीवर जाऊन वागू शकतो. याचा परिचय मालिका पाहताना आल्याशिवाय राहत नाही. आपल्या राणीनं सेवा देण्यात चूक केली म्हणून तिच्या पाठीवर गरम मेण ओतणारा राजा त्याच्या मुलाला आवडणा-या मुलीशी लग्न करतो. अर्थात हे त्याला माहिती नसते. राजाची पत्नी मुद्दाम ते त्याला माहिती होऊ देत नाही. त्यामागे सत्ता, संघर्ष याचा विचार आहे.

नवरा मेल्यावर स्त्रियांना जगण्याचा अधिकार नाही. तिनं तिच्या मर्यादा ओलांडल्या तर तिला जीवघेण्या वेदना देणे हेच पुरुषसत्ताक व्यवस्थेचे मुख्य काम होते. महिलांना गुलामापेक्षा कमी वागणुक नव्हती. या सा-या मुद्दयांना मालिकेत स्पर्श करण्यात आला आहे. मात्र ते ज्या कथेच्या साह्याने पडद्यावर साकारले आहे ते कमालीचे निराशा करणारा आहे. त्यामुळे ही मालिका रटाळवाणी झाली आहे. शिल्पा शिंदे, मिलिंद सोमण यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. तर कामांधं राजाची भूमिका सुंदरपणे अभिनेता अनु कपूर यांनी साकारली आहे. 

'वडिल लग्नाच्या विरोधात होते, काजलनं 22 वर्षांनी केला खुलासा

झी 5 वर ही 7 भागातील या मालिकेचा 1 ला सीझन अल्ट बालाजीवर प्रदर्शित झाला आहे. सच्छिंद्र वत्स यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. त्यात दिसून आलेल्या चांगल्या गोष्टी म्हणजे मिलिंद सोमणचा हटके लूक, प्रसिध्द कलादिग्दर्शक नीतिन देसाई यांचे कलादिग्दर्शन, बॅकग्राऊंड म्युझिक, छायांकन या बाबी मालिकेत प्रभावीपणे पाहायला मिळतात. बाकी सगळा आनंदच आहे. ज्यांना हॉट वेबमालिकांमध्ये रस आहे पण कथेत काही स्वारस्य नाही अशा प्रेक्षकांसाठी ही मालिका बेस्ट ऑप्शन म्हणावा लागेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: review of new web series paurushpur not worth to watching