रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार, एनसीबी रविवारी करणार रियाची चौकशी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 5 September 2020

एनसीबीने ड्रग पेडलर्ससोबतंच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणात रिया चक्रवर्तीची देखील चौकशी होणार आहे. 

मुंबई- सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग्सचा एँगल समोर आल्यापासून या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. आता या तपासात नारकोटिक्स ब्युरो टीम देखील दाखल झाली आहे. एनसीबीने ड्रग पेडलर्ससोबतंच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणात रिया चक्रवर्तीची देखील चौकशी होणार आहे. 

हे ही वाचा: 'बिग बॉस १४' मध्ये भोजपुरी स्टार आम्रपालीच्या एंट्रीची जोरदार चर्चा 

शौविक आणि सॅम्युअल यांना एनसीबीने अटक केल्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत रियाला एनसीबी चौकशीसाठी सम्नस पाठवणार आहेत. तपासात रियाचे चॅट्स समोर आले होते ज्यामध्ये तीने बेकायदेशीररित्या ड्रग्स खरेदी केले होते. अशात आता शौविकची ज्या आधारावर चौकशी करण्यात आली त्याच आधारावर आता रियाची देखील चौकशी केली जाणार आहे. एनसीबीकडे पुरावे म्हणून रियाचे चॅट्स आणि शौविकने रिया विरोधात दिलेला जबाब आहे त्यामुळे असं म्हटलं जात आहे की रिया चक्रवर्तीला रविवारी अटक होऊ शकते. 

एनसीबीने शौविकची चौकशी केली होती त्यावेळी शौविकने कबुल केलं होतं की तो बहीण रियासाठी ड्र्ग्सची खरेदी करत होता. रिपोर्ट्सनुसार रिया चक्रवर्तीवर ड्रग्स खरेदी करण्यासोबतंच त्याचा वापर देखील करत असल्याची माहिती मिळाली आहे. चौकशीत हे स्पष्ट झालं आहे की शौविकने ड्रग्स खरेदीसाठी रिया चक्रवर्तीच्या क्रेडिड कार्डचा वापर केला होता.   

रियाचे जे ड्रग्स चॅट समोर आले होते त्यात शौविक, मिरांडा सोबत प्रत्येक चॅटमध्ये रियाचं नाव आहे. यासोबतंच जया साहा आणि श्रुती मोदी यांची देखील नावं आहेत.

rhea chakraborty to be questioned-by ncb on sunday in sushant singh rajput case durg chat  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakraborty to be questioned-by ncb on sunday in sushant singh rajput case durg chat