'बिग बॉस १४' मध्ये भोजपुरी स्टार आम्रपालीच्या एंट्रीची जोरदार चर्चा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 5 September 2020

नुकतंच 'बिग बॉस'मध्ये राधे माँ सहभागी होणार असल्याची चर्चा असताना आता भोजपूरी अभिनेत्रीची चर्चा आहे.

मुंबई- 'बिग बॉस'चा १३ वा सिझन स्पर्धकांमुळे खूप चर्चेत राहिला होता. तसंच आत्तापर्यंतचा मनोरंजक सिझन असल्याचं म्हटलं गेलं होतं. यावेळी देखील 'बिग बॉस'च्या १४ व्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. शोच्या स्पर्धकांची लीस्ट आता हळूहळू समोर येत आहे. यात अनेक आश्चर्यचकित करणारी नावं आहेत. नुकतंच 'बिग बॉस'मध्ये राधे माँ सहभागी होणार असल्याची चर्चा असताना आता भोजपूरी अभिनेत्रीची चर्चा आहे.

हे ही वाचा: अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी १२'चं पुन्हा सुरु होणार शुटींग, सेटवर सुरु आहे अशी जय्यत तयारी

'बिग बॉस'मध्ये याआधीही भोजपूरी स्टार्सनी हजेरी लावली होती. खेसारी लाल यादव, निरहुआ (दिनेश लाल यादव), मनोज तिवारी यांच्यानंतर आता या शोमध्ये भोजपुरी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे एंट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भोजपुरी सिनेमातील या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या येण्याने शोमध्ये मनोरंजनाची लेवल कुठपर्यंत जाईल याचा अंदाज तुम्ही लावु शकता. रिपोर्ट्सनुसार आम्रपाली 'बिग बॉस १४' मध्ये सहभागी होणार आहे. तिला या सिझनबाबत विचारणा झाली आहे. 

आम्रपालीच्या एंट्रीची चर्चा जरी असली तरी अजुन याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर खरंच आम्रपाली दुबे 'बिग बॉस'मध्ये आली तर तिच्या चाहत्यांसाठी हे स्वप्नापेक्षा काही कमी नसेल. आम्रपाली सलमान खानची खूप मोठी फॅन आहे. आणि या शोच्या माध्यमातून जर तिला सलमानसोबत भेटण्याची संधी मिळत असेल तर ती का तयार होणार नाही असं देखील म्हटलं जात आहे.

आम्रपालीने एका मुलाखती दरम्यान सलमानबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. तिने त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती त्यामुळे आम्रपाली ही संधी सोडणार नसल्याचं कळतंय. आम्रपाली युपी-बिहारची खुप प्रसिद्ध स्टार आहे. तिची फॅन फॉलोईंग देखील तगडी असल्याकारणाने याचा तिला फायदा होऊ शकतो.   

bhojpuri star amrapali dubey offered bigg boss 14 after khesari and nirhua  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhojpuri star amrapali dubey offered bigg boss 14 after khesari and nirhua