सुशांतच्या मृत्युदिवशी 'या' व्यक्तीसोबत रिया फोनवर चक्क दीड तास बोलत होती

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 14 August 2020

नुकतंच AU नावाच्या व्यक्तीला रियाने ६३ वेळा कॉल केल्याचं समोर आलं होतं आणि आता तर सुशांतच्या मृत्युच्या दिवशी म्हणजेच १४ जुन रोजी रिया एका व्यक्तीशी दीड तास बोलत असल्याचं कॉल डिटेल्समधून समोर आलं आहे.

मुंबई- सुशांतसिंह राजपूत मृत्यु प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढतंच चालला आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या कॉल डिटेल्ससोबत त्याचे बँक डिटेल्सदेखील समोर आले होते. आता रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समधून अनेक धक्कायदायक खुलासे होत आहेत. नुकतंच AU नावाच्या व्यक्तीला तीने ६३ वेळा कॉल केल्याचं समोर आलं होतं आणि आता तर सुशांतच्या मृत्युच्या दिवशी म्हणजेच १४ जुन रोजी रिया एका व्यक्तीशी दीड तास बोलत असल्याचं कॉल डिटेल्समधून समोर आलं आहे.

हे ही वाचा: करिनाच्या गोड बातमीनंतर ट्विटरवर तैमूरंच तैमूर, मीम्सद्वारे चाहत्यांनी व्यक्त केली तैमुरची चिंता

मिडिया रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरातून ८ जूनला निघून गेली होती. तिच्या कॉल डिटेल मधून समोर आलं आहे की तिने सुशांतचं घर सोडल्यापासून ते त्याच्या मृत्युच्या दिवसापर्यंत सतत दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या संपर्कात होती. आता एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती सुशांतच्या मृत्युच्या दिवशी म्हणजेच १४ जूनला एका महिलेसोबत १ तासापेक्षा जास्तवेळ फोनवर बोलत होती. 

कॉल डिटेल्समधून समोर आलं आहे की रिया आणि सुशांतचं फोनवर शेवटचं बोलणं ५ जून रोजी झालं होतं. रियाच्या म्हणण्यानुसार तोपर्यंत रियाने सुशांतचं घर सोडलं नव्हतं. ५ जून रोजी सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी सुशांतने रियाला कॉल केला होता. दोघांमध्ये केवळ २ मिनिटे बोलणं झालं. त्यानंतर रियाने १० वाजण्याच्या आसपास सुशांतला कॉल केला होता. हा कॉल तर केवळ ३ सेकंद चालला. हे त्या दोघांचं शेवटचं संभाषण होतं. 

'या' व्यक्तींशी रियाने सुशांतच्या मृत्युआधी केलेली बातचीत

सुशांतच्या मृत्युआधी म्हणजेच १३ जून रोजी रियाने संध्याकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी कास्टिंग डिरेक्टर निशा चटालिया सोबत फोनवर चर्चा केली होती. रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी पुन्हा निशासोबत १ मिनिटे रिया बोलली होती. याचदरम्यान रियाने निर्माता-दिग्दर्शक इंद्रजीत नातोजी यांना ८ वाजून २६ मिनिटांनी फोन केला होता. त्यानंतर ९ वाजून २१ मिनिटांनी रुपा चढ्ढा नावाच्या एका महिलेला रियाने फोलृन केला होता. या महिलेशी रियाचं ७ मिनिच ८ सेकंद एवढा वेळ बोलणं झालं होतं. तर ९ वाजून ४३ मिनिटांनी AU नावाच्या व्यक्तीसोबत तिचं बोलणं झालं होतं. या व्यक्तिशी रिया जवळपास  १ तास ३८ मिनिटं बोलल्याचं कॉल डिटेल्स मधून समोर आलं आहे. 

सुशांतच्या मृत्युच्या दिवशी रियाचे कॉल डिटेल्स

१४ जून रोजी रियाने राधिका मेहता नावाच्या एका महिलेला सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी कॉल केला होता. जवळपास ३० मिनिटे ३३ सेकंद ती राधिकाशी बोलत होती. त्यानंतर ८ वाजून ८ मिनिटांनी पुन्हा राधिका मेहताने रियाच्या फोनवर कॉल केला आणि दोघी पुन्हा अर्धा तास एकमेकींशी बोलत होत्या. तिस-यांदा रियाने ८ वाजून ३८ मिनिटांनी पुन्हा राधिकाला कॉल केला तेव्हा त्या दोघी ५ मिनिटे ४१ सेकंद बोलत होत्या.   

rhea chakraborty call detail reveals her long conversation with radhika mehta  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakraborty call detail reveals her long conversation with radhika mehta