करिनाच्या गोड बातमीनंतर ट्विटरवर तैमुरंच तैमुर, मीम्सद्वारे चाहत्यांनी व्यक्त केली तैमुरची चिंता

kareena taimur ali khan
kareena taimur ali khan

मुंबई- करिना कपूर पुन्हा आई बनणार असल्याची गोड बातमी बुधवारी इंटरनेटवर वा-यासारखी पसरली. या बातमीसाठी चाहते देखील सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह झाले. सैफ आणि करिना दोघांनी अधिकृत स्टेटमेंट देऊन घरात नव्या पाहुण्याचं आगमन होत असल्याची बातमी दिली आणि मग काय नेहमीप्रमाणेच टीम टीम म्हणजेच तैमुर अली खान सोशल मिडियावर ट्रेंड होऊ लागला. ट्विटरवर तैमुरच्या मीम्सचा तर पूरंच आला आहे. चाहते मोठ्या प्रमाणावर हे मीम्स शेअर करत आहेत.  

करिना कपूर खान आणि सैफ अली खान या दोघांनी बुधवारी एक अधिकृत स्टेटमेंट दिलं ज्यात त्यांनी त्यांच्या घरी नव्या पाहुणा येणार असल्याने आनंद व्यक्त करत चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली. करिना दुस-यांदा आई होणार आहे. त्यामुळे आता तैमुरलाही त्याच्यासोबत खेळायला हक्काचा पार्टनर मिळणार आहे. सैफ-करिनान ही गोड बातमी देताच त्यांच्या चाहत्यांना तैमुरची चिंता सतावू लागली. तैमुरला तशी त्याच्या जन्मापासूनंच प्रसिद्धी मिळत गेली. त्याच्या गो-या-गुलाबी चेह-या पासून ते त्याच्या नावापर्यत सगळ्यामुळेच तो प्रकाशझोतात आला.

सैफ-करिनासोबत तैमुर दिसला की फोटोग्राफर्सची गर्दी झालीच म्हणून समजायची. सोशल मिडियावर देखील तैमुरचे फोटो लगेचच व्हायरल होतात. तेव्हा आता नवा पाहुणा येण्याने टीम टीमची प्रसिद्धी कमी होणार का यावरुन सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडतोय. 

एका युजरने आता प्रॉपर्टीचे चार भाग होणार असं म्हणत तैमुरचा रडणारा फोटो पोस्ट केला आहे तर दुस-या युजरने हेराफेरीचा सीन वापरत तैमुरची चिंता व्यक्त केली आहे.  

twitter flood with taimur ali khan memes after kareena kapoor and saif ali khan second baby announcement  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com