ड्रग्स कनेक्शनमध्ये रिया चक्रवतीने बॉलीवूडच्या २५ नावांचा केला खुलासा, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह सोबत 'या' सेलिब्रिटींचा समावेश?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 12 September 2020

रियाने बी-टाऊनच्या २५ मोठ्या नावांचा खुलासा केला आहे जे ड्रग्स घेत होते किंवा ड्रग्स पार्टीमध्ये सामील होत होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार या २५ नावांपैकी ५ नावं समोर आली आहेत.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग्स प्रकरणी एनसीबी तपास करत आहे. रियाला अटक केल्यानंतर तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठणीमध्ये ठेवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की रिया चक्रवर्ती ड्रग्स प्रकरणात बॉलीवूडच्या अनेक बड्या नावांचा खुलासा करु शकते. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, रियाने बी-टाऊनच्या २५ मोठ्या नावांचा खुलासा केला आहे जे ड्रग्स घेत होते किंवा ड्रग्स पार्टीमध्ये सामील होत होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार या २५ नावांपैकी ५ नावं समोर आली आहेत. यामध्ये सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंहसोबत इतर काही कलाकारांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय. 

हे ही वाचा:  अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन, अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार रियाने ज्या नावांचा उल्लेख केला आहे त्यामध्ये सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, आणि रियाची डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावांच्या समावेश आहे. तर अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार या तीन नावांसोबतंच आणखी दोन नाव आहे ती म्हणजे बॉलीवूडची मोठी पब्लिसिस्ट रोहिणी अय्यर जी स्वतःला सुशांतची चांगली मैत्रीण म्हणवते आणि कास्टिंग डिरेक्टर-दिग्दर्शक मुकेश छाब्रा. दिग्दर्शक म्हणून मुकेश छाब्रा यांचा पहिलाच सिनेमा तर सुशांतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'.

त्यामुळे आता एनसीबी यांच्याविरोधात पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं कळतंय. तसंच या नावांबद्दल खात्री पटल्यास त्यांना समन्स पाठवण्याच्या तयारीतही एनसीबी आहे.    

rhea chakraborty reveals sara ali khan rakul preet singh and other celebrities drug case as per media reports  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakraborty reveals sara ali khan rakul preet singh and other celebrities drug case as per media reports