अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन, अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 12 September 2020

या वर्षात सिनेइंडस्ट्रीत अनेकांना जगाचा निरोप घेतल्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीचं निधन झाल्याची बातमी आली आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन झालं आहे.

मुंबई- बॉलीवूडमधून पुन्हा एकदा एक वाईट बातमी समोर येत आहे. हे वर्ष बॉलीवूडकरांसाठी अनलकी असल्याचंच म्हटलं जातंय. या वर्षात सिनेइंडस्ट्रीत अनेकांना जगाचा निरोप घेतल्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीचं निधन झाल्याची बातमी आली आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आदित्यने अखेरचा श्वास घेतला आहे. 

हे ही वाचा: रियाच्या घरी सामानामध्ये लपवून पाठवला गेला होता गांजा, कुरिअर बॉयने दिपेश आणि शौविकला ओळखलं  

आदित्य पौडवाल गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होता असं कळतंय. हा आजार वाढल्याने काही दिवसांपूर्वीच आदित्यला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोना दरम्यानच्या नियमांचं पालन करत त्याच्यावर मुंबईत अंतिम संंस्कार केले जातील.  अनुराधा पौडवाल यांचं लग्न प्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल यांच्यासोबत झालं होतं. अरुण एस.डी बर्मन यांचे सहाय्यक होते तसंच ते स्वतः देखील संगीतकार होते.

नव्वदीच्या दशकात अनुराधा पौडवाल यशाच्या शिखरावर होत्या. त्याचवेळी त्यांचे पती अरुण पौडवाल यांचा एका दुर्घटनेत मृत्यु झाला. मुलगा आदित्य पौडवालने आई अनुराधा पौडवालप्रमाणेच अनेक प्रकारची भजनं गायली होती. त्याचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सगळ्यात कमी वयाचा संगीत दिग्दर्शक म्हणून सामील आहे. आदित्यनंतर अनुराधा पौडवाल यांना मुलगी कविता पौडवाल आहे.    

anuradha paudwal son aditya paudwal dies at the age of 35  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anuradha paudwal son aditya paudwal dies at the age of 35