esakal | रिया चक्रवर्तीने नाकारली 'बिग बॉस'ची इतक्या लाखांची ऑफर
sakal

बोलून बातमी शोधा

Rhea Chakraborty

रिया चक्रवर्तीने नाकारली 'बिग बॉस'ची ऑफर; मिळणार होते इतके लाख रुपये

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss 15 : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या 'बिग बॉस'चा पंधरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये विविध क्षेत्रात चर्चेत असणारे १५ स्पर्धक १०० दिवसांसाठी एकाच घरात राहतात. या नव्या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील, याविषयी तर्कवितर्क लावले जात असताना अभिनेत्री रिया चक्रवर्तीचीही Rhea Chakraborty चर्चा होत आहे. रियाला बिग बॉसकडून ऑफर मिळाली असून तिने ही ऑफर नाकारल्याची माहिती समोर येत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार रियाला बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी तब्बल ३५ लाखांहून अधिक मानधनाची ऑफर देण्यात आली होती. मात्र ही ऑफर रियाने नाकारली आहे.

येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉसचा पंधरावा सिझन सुरू होणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती बरीच चर्चेत होती. ड्रग्ज प्रकरणी तिला अटकसुद्धा करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर रिया बॉलिवूड आणि दाक्षिणात्य निर्मात्यांची भेट घेत आहे. अभिनयक्षेत्रात पुन्हा नव्याने काम सुरू करण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. अशातच तिला बिग बॉसची ऑफर मिळाली होती. रियाने सध्या माध्यमांपासून दूरच राहणं पसंत केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रियाचा 'चेहरे' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिच्यासोबत अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा: 'गायत्री-मीराला बिग बॉसच्या घराबाहेर काढा'; नेटकरी भडकले

दिग्दर्शक रुमी जाफरींकडून रियाचं कौतुक

"रियाने चेहरे या चित्रपटात अत्यंत दमदार भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिच्याभोवती असणाऱ्या वादाचा माझ्या चित्रपटावर परिणाम होईल असं मला वाटत नाही. सध्या माध्यमांचाही दृष्टीकोन बदलला आहे. गेल्या वर्षी अनेकजण रियाला बरंवाईट सुनावत होते आणि आता वर्षभरानंतर तिला सर्वांत आकर्षक महिलेचा पुरस्कार देण्यात आला. आता विनाकारण तिला लोक ट्रोल करत नाहीत", असं ते 'न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

loading image
go to top