'गायत्री-मीराला बिग बॉसच्या घराबाहेर काढा'; नेटकरी भडकले

सोशल मीडियावर या दोघींना खूप ट्रोल केलं जात आहे.
'गायत्री-मीराला बिग बॉसच्या घराबाहेर काढा'; नेटकरी भडकले

Bigg Boss Marathi 3 : कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. विविध क्षेत्रातील १५ स्पर्धत ९० दिवसांसाठी एकत्र घरामध्ये राहत आहे. प्रत्येक स्पर्धकाविषयी प्रेक्षकांच्या मनात एक प्रतिमा तयार होऊ लागली आहे. यापैकी काही स्पर्धकांना नेटकऱ्यांकडून आणि प्रेक्षकांकडून चांगला पाठिंबा मिळतोय. तर काही स्पर्धकांचा तीव्र विरोध करण्यात येतोय. अभिनेत्री गायत्री दातार Gayatri Datar आणि मीरा जगन्नाथ Meera Jagannath या दोघींना प्रेक्षकांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. मीराने बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच भांडणाचा सूर लावला आणि तिला त्यात गायत्रीची साथ मिळाली. मात्र या दोघींचं असं वागणं नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत नाहीये. बिग बॉसच्या प्रोमोवर कमेंट्स करत अनेकांनी गायत्री आणि मीराला घरातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

शनिवारच्या चावडीत सूत्रसंचालक महेश मांजरेकरांनीसुद्धा गायत्री आणि मीराची चांगलीच शाळा घेतली होती. गायत्री मीरासमोर नंदीबैलाप्रमाणे बुगू बुगू करत वागते, अशा शब्दांत मांजरेकरांनी सुनावलं होतं. तेव्हापासून या दोघींना सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. 'गायत्री आणि मीरा, तुम्हाला प्रेक्षक पाहत आहेत. या सिझनमधील सर्वांत वाईट स्पर्धक तुम्ही दोघी आहात', असं एकाने म्हटलंय. तर 'बुगू बुगू गायत्री कधीतरी स्वःताच्या बुद्धीचा वापर करुन खेळ, सारखं त्या मीराच्या मागून सेफ गेम का खेळते', असा सवाल दुसऱ्याने केला.

'गायत्री-मीराला बिग बॉसच्या घराबाहेर काढा'; नेटकरी भडकले
माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती
'गायत्री-मीराला बिग बॉसच्या घराबाहेर काढा'; नेटकरी भडकले
प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला पाटील 'बिग बॉस'च्या घराबाहेर

एकीकडे गायत्री आणि मीराला नेटकऱ्यांकडून विरोध होत असताना विशाल निकम आणि विकास पाटील यांना प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळतोय. अनेकांनी विशालची साथ दिली असून तो अंतिम फेरीपर्यंत नक्की पोहोचेल, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com