'तो एका दिवसात ४ वेळा स्मोक करतो त्यानुसार...' रिया चक्रवर्ती आणि शौविकचं ड्रग चॅट आलं समोर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 4 September 2020

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यामध्ये मार्च २०२० मध्ये झालेलं व्हॉट्सअप चॅट आता समोर आलं आहे. यामध्ये दोघेही ड्रग्ससंबंधी बोलत आहेत.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग कनेक्शनसंबंधी आता नवीन खुलासा होत आहे. याच्याशीसंबंधित असे अनेक व्हॉट्सअप चॅट समोर आले आहेत ज्यामुळे ड्रग कनेक्शन वरिल संशय आता आणखीनच बळावत चालला आहे. सीबीआय आधीपासूनंच या प्रकरणात तपास करत आहे. यादरम्यान रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यामध्ये मार्च २०२० मध्ये झालेलं व्हॉट्सअप चॅट आता समोर आलं आहे. यामध्ये दोघेही ड्रग्ससंबंधी बोलत आहेत.

हे ही वाचा: 'सुशांत उपचारांदरम्यान रडायचा, त्याला आत्महत्येचे विचारयेत होते' सुशांतच्या डॉक्टरचा दावा

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील सुशांत प्रकरणात ड्रग्सचा उल्लेख झाल्याने तपास करत आहेत. रिया चक्रवर्ती आणि भाऊ शौविक यांचे ड्रग्सच्या व्यापार संबंधिचे काही चॅट आणि त्यांच्या वडिलांसाठी मुलाद्वारे ड्रग्स खेरदी करणारी माहिती समोर आली आहे. आता एका नवीन चॅटमध्ये रिया आणि शौविक बड नावाच्या ड्रग्सबाबत बोलत आहेत. 

वाचा नेमकं काय चॅट झालं दोघांमध्ये ?

रिया- हां प्लीज

रिया- तो एक दिवसात चारवेळा स्मोक करतो. त्या हिशोबाने बघा.

शौविक- आणि बड (BUD) डोस देखील त्याला हवा आहे. 

रिया- हो बड देखील

शौविक- ठीक आहे. पाच ग्रॅम बड घेऊ शकतो.

शौविक- जे २० Doodsचं आहे. (२० सिगारेट बनू शकतात) 

या चॅटमध्ये ज्या बडविषयी बोललं जातंय ते एक प्रकारचं ड्रग आहे. जे परदेशातून आणून मुंबईत विकलं जातं. मुंबईमध्ये या ड्रग्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. याची खूप मागणी असते. हे कोकिनपेक्षाही जास्त महाग किंमतीत विकलं जातं. 

rhea chakraborty whatsapp chat with brother showik in march accessed indicates drug connection


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakraborty whatsapp chat with brother showik in march accessed indicates drug connection