लॉकडाऊनमध्ये रिचा चढ्ढाला 'ही' गोष्ट शिकण्याची लागली आहे ओढ.. पाहा व्हिडिओ

richa chadda
richa chadda
Updated on

मुंबई- देशभरात लॉकडाऊन असल्याकारणाने सेलिब्रिटी भलेही घराबाहेर निघू शकत नसले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून ते प्रत्येक क्षणी त्यांच्या चाहत्यांसोबत जोडले गेलेले आहेत. लॉकडाऊनमधल्या या वेळेत ते घरी बसून काय करत आहेत याचे अपडेट्स ते सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना देत असतात. याचदरम्यान अभिनेत्री रिचा चढ्ढाने देखील ती घरात काय करत आहे याची माहिती तिच्या सोशल अकाऊंटवरुन दिली आहे.

अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या घरातल्या घरात बेली डान्स शिकत आहे. याबद्दलची माहिती तिने स्वतः तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन दिली आहे. तिने बेली डान्स करतानाचा तिचा हा व्हिडिओ चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला रिचाने एक छान कॅप्शन दिलं आहे जे चाहत्यांना चांगलंच पसंत पडत आहे. 

रिचाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, डांस,वॉर्म अप, आज एका मुलाखतीत मला लोकांनी विचारलं की त्यांना माहित नाही की मी एक कथ्थक डान्सर आहे तसंच मी कधीच कोणत्या सिनेमात डान्स का नाही केला ? यावर माझी प्रतिक्रिया होती, की मी सध्या एक नवीन कला शिकत आहे. डोक्यात कोणताही हेतु किंवा अपेक्षाविना हे शिकणं गरजेचं आहे. ही कला आपल्याला सिनेमात कामी येईल किंवा कोणत्या तरी ,समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात उपयोगी पडेल म्हणून शिकता कामा नये. एक सुंदर पेंटिंग पाहून मी एक उत्तम कलाकार बनू शकते. चांगला कलाकार होण्यासाठी चांगल्या कविता आणि साहित्य वाचू शकते. गाणं कसं गायलं जातं हे शिकतेय जेणेकरुन मी आणखी चांगली कलाकार बनू शकेन. केवळ अनुभवासाठी या गोष्टी आपण करु शकतो. कारण अनुभव ही एक प्रकारची साखळीच आहे. आपल्याला प्रेरणा कुठुनही मिळू शकते.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Dance warm up . . . Today in an interview I got asked why 

A post shared by Richa Chadha (@therichachadha) on

सोशल मिडियावर या डान्ससोबतंच तिची ही खास पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तिचे चाहते आणि युजर्स यावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओमध्ये रिचा आरश्यासमोर तिचा हा बेली डान्स शूट करताना दिसत आहे.   

richa chadda shared her belly dance video on social media during lockdown  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com