Richa Chadha: 'लाज वाटली पाहिजे तुला असं बोलताना', केके मेनन रिचावर संतापला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress richa chadha

Richa Chadha: 'लाज वाटली पाहिजे तुला असं बोलताना', केके मेनन रिचावर संतापला!

Richa Chadha Contraversy: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा ही भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं भारतीय सैन्यांविषयी केलेलं आक्षेपार्ह विधान हे अनेकांना खुपलं आहे. त्यामुळे रिचा सोशल मीडियावरही ट्रोल झाली आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तिला चांगलेच सुनावले आहे.

आता प्रसिद्ध अभिनेता केके मेनन यानं देखील रिचावर नाराजी व्यक्त केली आहे. कालपासून रिचावर कित्येकांनी आपला राग व्यक्त केला आहे. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सेलिब्रेटींनी रिचावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारतीय सैन्याविषयी बोलणे रिचाला शोभते का असे अनेकांनी म्हटले आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी रिचावर नाराजी व्यक्त करत यापूर्वी देखील तिनं केलेल्या वक्तव्याची तिला आठवण करुन दिली आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

केके मेनननं रिचाच्या त्या वक्तव्याविषयी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या व्टिटमध्ये तो म्हणतो, मेनननं रिचाच्या त्या पोस्टचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्याविषयी लिहिलं आहे की, आपल्या देशासाठी जे प्राणांची बाजी लावून लढतात त्यांच्याबद्दल बोलताना आदर बाळगला पाहिजे. त्यांच्याबद्दल जेव्हा आपण अपशब्द वापरतो तेव्हा आपल्याला लाज वाटली पाहिजे.

हेही वाचा: Video Viral : लांबलचक साप घरी आला अन् चक्क चप्पल घेऊन पळाला

मेनन यांच्या त्या व्टिटनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं देखील रिचावर टीका केली होती. रिचानं तिला वाढणारा विरोध लक्षात घेता तिनं आपल्या वक्तव्याविषयी माफी मागितली आहे,.

हेही वाचा: Richa Chadha: आधी बोलून गेली, आता माफी! भारतीय सैनिकांचा केला होता अपमान