
Grammy Awards 2023 : अभिमानास्पद! भारतीय म्यूझिक कंपोझर रिकी केजनं तिसऱ्यांदा मिळवला ग्रॅमी पुरस्कार...
जगातील सर्वात मोठ्या संगीत पुरस्कारांपैकी एक, ग्रॅमी अवॉर्ड्स 2023, यावेळीही चर्चेचा विषय राहिला आहे. 65 व्या ग्रॅमी पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा सोमवारी म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या प्रकरणात प्रसिद्ध पॉप गायिका बियॉन्स नोल्सने इतिहास रचला आहे. यासोबतच भारतीय वंशाचा फेम रिकी केजनेही पुन्हा एकदा ग्रॅमी अवॉर्ड जिंकले आहेत.
ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 मध्ये जर कोणत्याही पॉप गायकाचा जलवा होता तर ती बियॉन्से होती. बियॉन्से नोल्सने तिच्या कारकिर्दीत ३२व्यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. यासह, 65 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट डान्स/इलेक्ट्रॉनिक म्युझिक अल्बम श्रेणीमध्ये रेनेसेन्ससाठी बियॉन्से नोल्सची विजेता म्हणून निवड करण्यात आली आहे.याशिवाय बियॉन्सेने यंदाच्या ग्रॅमीमध्ये सर्वोत्कृष्ट R&B गाण्याची श्रेणीही जिंकली आहे.
भारतीय वंशाचे प्रसिद्ध संगीतकार रिकी केज यांच्यासाठी ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 अतिशय खास ठरला आहे. रिकी केजने या वर्षीच्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये ब्रिटीश प्रसिद्ध रॉक बँड द पोलिसचा ड्रमर स्टुअर्ट कोपलँडसोबत शेअर करून हे शीर्षक जिंकले आहे. रिकी रेज आणि कोपलँड यांनी सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी अवॉर्ड जिंकले आहेत.
रिकी केजने कारकिर्दीत तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावल्याची माहिती आहे. तसेच सितार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकरलादेखील दोन कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे.