Sidharth Kiara Wedding: शाही महालालाही लाजवेल असे आहे सिद्धार्थ कियाराचे वेडींग डेस्टीनेशन; एका दिवसाचे भाडे ऐकाल तर चक्रावून जाल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Kiara Wedding

Sidharth Kiara Wedding: शाही महालालाही लाजवेल असे आहे सिद्धार्थ कियाराचे वेडींग डेस्टीनेशन; एका दिवसाचे भाडे ऐकाल तर चक्रावून जाल!

सध्या बॉलिवूडमध्ये कच चर्चा आहे ती म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची. उद्या म्हणजेच ७ फेब्रुवारीला हे दोघे राजस्थानमधील जैसलमेरच्या सुर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी निवडलेले हे पॅलेस किती खास आहे याबद्दल जाणून घेऊयात.

 

लगिनघाई सुरू असल्याने कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेरला पोहोचले आहेत.त्यांच्या या शाही लग्नाला व्हराडी मंडळीही पोहोचली असून यात करण जोहर, शाहिद कपूर यांचाही समावेश आहे. सूर्यगड पॅलेस हा एका शाही किल्ल्यापेक्षा कमी नाही. अनेक मोठ्या विवाहांचा तो साक्षीदार बनला आहे.

राजेशाही थाटात लग्न करणाऱ्यांच्या यादीत या महालात बॉलिवूडशिवाय हॉलिवूडचे स्टार्सही आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई देखील सूर्यगढ पॅलेसमध्ये आयोजित एका लग्नात सहभागी झाले होते. 65 एकरमध्ये पसरलेल्या या महालात एक दिवस घालवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतील.

जैसलमेर हे राजस्थानचे सुवर्ण शहर म्हणून ओळखले जाते. 12 व्या शतकातील हे शहर वाळवंटाने वेढलेले आहे. त्यामूळे हॉलिवूडच्या ‘द ममी’ ला शोभेल असे वाळवंट आणि मध्यभागी महाल असे चित्र तिथे पहायला मिळते.

किती आहे एका दिवसाचे भाडे

सूर्यगड पॅलेस जैसलमेर शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर वाळवंटात आहे. सूर्यगड पॅलेस जैसलमेरमध्ये डिसेंबर 2010 मध्ये पूर्ण झाला. याच्या बांधकामासाठी जैसलमेरच्या पिवळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. 83 लक्झरी गेस्ट रूम्स, स्विमिंग पूल, गार्डन आणि गेस्ट रूम्स सारख्या सुविधा आहेत.

सूर्यगड पॅलेसमध्ये पाच प्रकारच्या खोल्या आहेत. फोर्ट रूममध्ये एका दिवसाची किंमत २६ हजार रुपये आहे. तर, पॅव्हेलियन रूमचे एका दिवसाचे भाडे सुमारे 28,674 रुपये आहे. तिसरा प्रकार म्हणजे हेरिटेज रूम. त्याचे दैनंदिन भाडे 30 हजार 600 रुपयांहून अधिक आहे.  तर, सिग्नेचर स्टाइल रूमचे एका दिवसाचे भाडे 35 हजार रुपयांहून अधिक आहे. आलिशान शैलीतील खोलीचे एका दिवसाचे भाडे 39 हजार रुपयांहून अधिक आहे.

आपल्या राज्यातले आमदार जसे गुहावटीला गेले होते तसेच 2020 मध्ये राजस्थानच्या राजकीय संकटादरम्यान, सीएम अशोक गेहलोत यांनी पाठिंबा दिलेल्या 90 आमदारांना जयपूरहून जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हलवण्यात आले होते.

देशातील पहिला समलिंगी विवाह याच हॉटेलमध्ये झाला होता. यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. हॉटेलच्या सुविधांबद्दल बोलायचे झाले तर, येथे 84 खोल्या, 92 बेडरूम आहेत. याशिवाय दोन मोठे गार्डन आहेत. याशिवाय एक तलावही आहे. त्याच वेळी, एक जिम, बार, इनडोअर स्विमिंग पूल आहे. किल्ल्यावर पाच मोठे व्हिला, दोन मोठे रेस्टॉरंट्स, इनडोअर गेम्सची सोय आहे. घोडेस्वारीसाठी मैदाने, मिनी प्राणीसंग्रहालय देखील आहेत.