रिंकू राजगुरूच्या 'कागर'चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाच वास्तवादी चित्र आपल्यासमोर 'कागर'च्या ट्रेलरच्या माध्यमातून उलगडताना दिसत आहे. 

मुंबई - रिंकू राजगुरूच्या 'कागर' चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाच वास्तवादी चित्र आपल्यासमोर 'कागर'च्या ट्रेलरच्या माध्यमातून उलगडताना दिसत आहे. 

एककीडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा 'कागर'चे दिग्दर्शन मकरंद माने करणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल तीन वर्षानंतर रसिकांच्या भेटीला येतेय. तर, याच चित्रपटातून शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेता रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. हा चित्रपट 26 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Rinku Rajgurus Kaagar Official Trailer