'जावईबापू आता...' लेकीनंतर आईची प्रतिक्रिया | Urvashi Mother Reaction on Rishabh Pant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Mother Reaction on Rishabh Pant

Urvashi Mother Reaction on Rishabh Pant : 'जावईबापू आता...' लेकीनंतर आईची प्रतिक्रिया

Rishabh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत लवकर बरा व्हावा म्हणून चाहते देवाचा धावा करत आहे. यासगळ्यात ऋषभची मैत्रीण उर्वशी रौतेलाच्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष आहे. आता उर्वशीच्या आईनं ऋषभ पंतसाठी खास पोस्ट शेयर केली आहे.

मीरा रौतेला यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सोशल मीडियावर ज्या काही अफवा आहेत त्याचा कोणताही परिणाम ऋषभवर होणार नाही. ऋषभ तू कोणतीही काळजी करु नको. तुला आणखी खेळायचे आहे. उत्तराखंडचे नाव जगात मिरवायचे आहे. तेव्हा सिद्दबली बाबा तुझ्यावर कृपा करतील. हीच त्यांच्याकडे प्रार्थना असे मीरा यांनी म्हटले आहे.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

उर्वशीची आई मीरा रौतेला यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी उर्वशीला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, तुमची मुलगी देखील तुमच्या सारखी माणूसकी असणारी हवी होती. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, उर्वशी तुला कोणत्या वेळी कशापद्धतीनं व्यक्त व्हावे हे कळायला हवे,

काही दिवसांपूर्वी ऋषभचा दिल्ली - डेहराडून हायवेवर मोठा अपघात झाला. त्यावेळी त्याची कार डिव्हाडरला धडकली. आणि त्यात ऋषभ गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. तो सध्या दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार घेत असून आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी ऋषभची भेट घेतल्याचे दिसून आले आहे. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Aditi Rao Haydari : 'हदयात वाजे समथिंग!'

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतला आता आयसीयुमधून स्थलांतरित करण्यात आले आहे. खासगी वॉर्डमध्ये त्याला ठेवण्यात आले असून येत्या काळात त्याच्या प्रकृतीमध्ये वेगानं सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ऋषभच्या त्या घटनेवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

कपिल देव यांनी आपण काय काळजी घ्यायला हवी, आपण कोण आहोत सारा देश जेव्हा तुम्हाला फॉलो करत असतो तेव्हा काय जबाबदारी असते याचे भान ठेवायला हवे. असेही सांगितले होते. त्यामुळे कपिल देव यांची प्रतिक्रिया चर्चेत आली होती. उर्वशीला दोनवेळा सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. तिनं इंस्टा आणि ट्विटरवरुन ऋषभ लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना केली आहे.