ऋषी कपूर-नितू सिंग करतायत इटलीत मजा! फोटो बघाच...

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर नुकतेच कर्करोगातून बरे होऊन बाहेर पडले आहेत. सध्या ते पत्नीसोबत इटलीत सुट्या एन्जॉय करत आहेत. अभिनेत्री व ऋषी कपूर यांची पत्नी नितू सिंग यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर नुकतेच कर्करोगातून बरे होऊन बाहेर पडले आहेत. सध्या ते पत्नीसोबत इटलीत सुट्या एन्जॉय करत आहेत. अभिनेत्री व ऋषी कपूर यांची पत्नी नितू सिंग यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. हे जोडपं ज्या प्रकारे सुट्यांचा आनंद लुटत आहेत, हे बघून त्यांचे चाहतेही खूश झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Last cuppa in capri

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

कालत नितू सिंग यांनी त्यांचा लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यात ते काप्री कॅफेमध्ये निवांत बसले आहेत. 5-6 दिवसांपूर्वीही नितू यांनी त्यांच्या ट्रीपचे फोटो शेअर केले होते. यात ऋषी आणि नितू त्यांच्या मित्रमंडळींसह दिसत आहेत आणि नौकाविहाराचा आनंद घेत आहेत. काही आठवड्यांपूर्वी नितूने त्या दोघांचे आणखी एक फोटो शेअर केला होता, यात ते जेवणाचा आणि चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. तसेच नितूने त्यांच्या दोघांचा सेल्फीही शेअर केलाय. 

गेल्या काही महिन्यांपासून हे दोघं इटलीत सुट्यांची मजा घेत आहेत. अधून-मधून मुलगा रणबीर आणि मुलगा रिदीमा त्यांना भेट द्यायला तिकडे जात होते. ऋषी कपूर नुकतेच कर्करोगातून बाहेर आले आहेत. पण या सर्व ट्रीपमध्ये ते फ्रेश आणि आनंदी दिसत आहेत. 

 

राहुल रावेल यांनी ऋषी कॅन्सरफ्री झाल्याचा केला होता खुलासा 
ऋषी कपूर अमेरिकेत आजारावर उपचार घेत आहे. त्यांना कोणता आजार आहे याची माहिती त्यांचे कुटुंबिय देत नव्हते, तरी त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती सोशल मीडियाद्वारे त्यांचे कुटुंब देत होते. अशातच ऋषी कपूर यांचे मित्र व फिल्ममेकर राहुल रावेल यांनी एप्रिलमध्ये 'ऋषी कपूर (चिंटू) कॅन्सरमुक्त' झाल्याचे सांगितले होते. त्यापूर्वी काही महिन्यांआधी कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित 'मी या उपचारांमुळे थकलो आहे, हा उपचार आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. हळू हळू प्रकृतीत सुधारणा होत आहे, लवकरच मी काम सुरू करेन.' असे सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishi And Nitu Kapoor enjoying vacation at Italy