Ved Movie Box Office Collection: रितेशचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट! आता प्रतिक्षा सेंच्यूरीची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ved Movie Box Office Collection

Ved Movie Box Office Collection: रितेशचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट! आता प्रतिक्षा सेंच्यूरीची

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून तर जिनिलियाचा देखील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हा पहिलाच चित्रपट आहे. रितेश व जिनिलीयाच्या 'वेड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जणू काही जादूच केली आहे.

हेही वाचा: Pathaan Movie: पैशाला नाय तोटा 'पठाण'चा आनंद मोठा! अडीच हजारांना एक तिकिट, तरीही...

या चित्रपटाने प्रेक्षकांना 'वेड'लावलय असं म्हटलंतर वावगं ठरणार नाही. 'वेड' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रिलीजच्या २४ व्या दिवशीही या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्शने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘वेड’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant Video Viral: 'आई आजारी तरी मी 'पठाण'वर रिल बनवणार', राखीची अजब इच्छा

पहिल्या दिवसापासूनच 'वेड'नं बॉक्स ऑफिसवर त्याची घट्ट पकड निर्माण केली होती. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने तब्बल ५० कोटींची कमाई केली.

प्रदर्शनाच्या २४ व्या दिवशीही म्हणजेच २२ जानेवारी रविवार या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली.  रविवारी  चित्रपटाने तब्बल १ कोटी ७० लाखांचा बिझनेस केला. याचसोबत 'वेड' ची एकूण कमाई ५५. २२ कोटींवर पोहोचली आहे.

हेही वाचा: Ved Movie Box Office Collection: अखेर 'वेड'नं केला 50 कोटीचा टप्पा पार! रितेशचा जेनेलियानं जिंकलं..

'वेड' हा सिनेमा नागा चैतन्य आणि सामंथा यांच्या 'मजिंली' या तेलुगू सिनेमावर आधारित सिनेमा असलातरी रितेश आणि जिनिलियाचा जोडीला भरभरून प्रेम मिळत आहे‌. आता 'वेड' १०० करोडचा टप्पा कधी पार करणार याची रितेशच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.