Riteish Deshmukh birthday: अभिनय ही पहिली पसंती नव्हतीच रितेशला व्हायचं होतं...

Riteish deshmukh
Riteish deshmukh Esakal
Updated on

Riteish Deshmukh birthday: केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर भूमिकांमध्येही सहज बसू शकणारा बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख याने स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने केवळ एकाचं शैलीतच त्याने अभिनय केला नाही तर वेगवेगळ्या भूमिकाही केल्या आहेत.

त्यांची हाऊसफुल सीरीज ते धमाल यांसारख्या अनेक विनोदी चित्रपटांमध्ये त्याने आतापर्यंत आपल्या अभिनयानं लोकाचं मनोरंजन केलंय आहे तर दुसरीकडे, एक व्हिलनमध्ये नकारात्मक भूमिका साकारून रितेशने हे सिद्ध केले आहे की, तो कोणतीही व्यक्तिरेखा अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकतो.

Riteish deshmukh
Riteish Deshmukh birthday: नात्याला वीस वर्ष होऊनही रितेश जेनेलियासाठी वेडा.. कारण..

'तुझे मेरी कसम' चित्रपटातून रितेशने चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटात त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा हिनेही काम केले होते. जरी तो त्याच्या पहिल्या चित्रपटातून लोकांमध्ये तितका लोकप्रिय झाला नाही. 2004 मध्ये रिलीज झालेल्या 'मस्ती' चित्रपटाने त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. रितेश आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करतो.

Riteish deshmukh
Boycott Pathaan: "दिपिकाची बिकीनी भगव्या रंगाचीच का?" 'बेशरम रंग' गाण्यावरुन ट्विटरवर राडा...

मात्र अभिनय हे क्षेत्र त्यांची पहिली आवड नव्हती. त्यांची फार कमी लोकांना माहित असेल की अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी रितेश एक आर्किटेक्ट होता. मुंबईच्या कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून त्यांनी आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर परदेशी आर्किटेक्ट फर्ममध्ये प्रॅक्टिस सुरू केली. येथे त्यांनी वर्षभर काम केले.

Riteish deshmukh
Divorce2022: नुसते घटस्फोट! जोडीदाराला वैतागून यंदा या कलाकारांनी घेतले काडीमोड..

त्यानंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि चित्रपटसृष्टीकडे आपला तो वळाला. रितेशने डेब्यू चित्रपट काम केलेल्या अभिनेत्री जेनेलियाशी लग्न केले आहे. नऊ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले. याता या जोडीचा मराठी चित्रपट वेड हा पदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी त्याचे चाहते खूप उत्सूक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com