Ved: All Time Blockbuster 'वेड'ची नॉट आउट हाफ सेंच्यूरी.. अजुनही विक्रमी कमाई सुरुचं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ved movie, riteish deshmukh, genelia deshmukh

Ved: All Time Blockbuster 'वेड'ची नॉट आउट हाफ सेंच्यूरी.. अजुनही विक्रमी कमाई सुरुचं

Ved Movie News: रितेश देशमुख - जिनिलिया देशमुख यांच्या वेड सिनेमाची जादू अजूनही कायम आहे. वेड प्रदर्शित होऊन तब्बल दीड महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही वेड सगळ्या महाराष्ट्रभरात गाजत आहे.

दिवसेंदिवस वेड कमाईचे नवीन आकडे मोडत जातोय. नुकतीच रितेश - जिनिलियाच्या वेड बद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे मराठी प्रेक्षकांना नक्कीच आनंद होईल.

(riteish deshmukh genelia deshmukh ved movie complete 50 days in theatre)

वेड सिनेमाच्या टीमने नुकतीच एक पोस्ट रिलीज केलीय. या पोस्टमध्ये वेड ने ५० दिवस पूर्ण केल्याचं सांगितलं आहे. All Time Blockbuster झालेल्या वेडने यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत.

वेडनेस कोणीही थांबवू शकत नाही.. तुमच्या प्रतिसादासाठी खूप आभार.. आमच्याकडे शब्दच नाहीत.. अशा शब्दात रितेशच्या मुंबई फिल्म कंपनीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत

५० दिवस पूर्ण करून वेड ने कमाईत सुद्धा बाजी मारली आहे. वेडने आतापर्यंत ७४ कोटींचा टप्पा पूर्ण केलाय. जगभरात वेडने ७४ कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून भारतात वेडने ६०. ६७ कोटींची कमाई केली आहे.

अशाप्रकारे सैराटननंतर वेड सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरल्याची शक्यता आहे. वेड निमित्ताने मराठी सिनेमांची नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात झालीय.

वेड सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी वेडने हाउसफुल्लची पाटी झळकवली.

वेडला मिळणार प्रतिसाद बघून रितेशने वेड तुझा या गाण्याचं नवीन व्हर्जन आणि काही प्रसंग समाविष्ट करून वेडची नवीन कॉपी थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वेड पाहायला गर्दी केली.

वेड सिनेमात रितेश - जिनिलिया जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.सुपरस्टार सलमान खानचं वेड लावलंय हे विशेष गाणं प्रचंड गाजलं.

मराठी कलाकारांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या गाण्यावर रील व्हिडिओ बनवले आहेत. वेड आता लवकरच ८० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.