esakal | 'दोघांत तिसरा'; रितेश जेनेलियाच्या व्हिडीओतील ती खास व्यक्ती कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

riteish deshmukh, genelia d'souza

'दोघांत तिसरा'; रितेश जेनेलियाच्या व्हिडीओतील ती खास व्यक्ती कोण?

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात क्युट कपल म्हणजे अभिनेत्री जेनिलिया डिसूजा(Genelia D'Souza) आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh). जेनिलिया आणि रितेश सोशल मीडियावर सक्रिय असते. रितेश आणि मुलांसोबतचे धमाल मस्तीचे व्हिडीयो जेनेलिया सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. रितेश आणि जेनिलियाच्या प्रत्येक व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते. नुकतीच रितेशने जेनेलियासोबतचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या व्हिडीओमध्ये रितेश जेनिलीया व्यतिरिक्त अजुन एक खास व्यक्ती दिसत आहे.(riteish deshmukh genelia d'souza romantic video get viral milap zaveri this prank video)

रितेशने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो आणि जेनेलिया एका सोफ्यावर बसले आहेत. त्यावेळी सोफ्या मागे कोणी तरी लपले आहे असे दिसते आहे. जेव्हा जेनिलीया तिथून निघून जाते. तेव्हा सोफ्यामागुन दिग्दर्शक मिलाप जावेरी बाहेर येतात. मिलाप यांना पाहून रितेश घाबरतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण मिलाप त्याला पकडून ठेवतात. रितेशने शेअर केल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला 18 हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा: 'गोरेपणाला भाव देणाऱ्या प्रॉडक्टची जाहिरात नकोच'

रितेश आणि जेनेलियाच्या केमिस्ट्रिचा चाहता वर्ग मोठा आहे. 'तुझे मेरी कसम या' हिंदी चित्रपटाच्या सेटवर जेनिलिया आणि रितेशची ओळख झाली. जेनिलिया आणि रितेश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2012 साली लग्न केले. जेनिलीया आणि रितेशला राहिल आणि रियान नावाचे दोन मुलं आहेत. लवकरच रितेश 'बच्चन पांडे' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा: सोनाली ते यामी.. धूमधडाका नाही तर साध्या विवाहाला पसंती देणाऱ्या अभिनेत्री