रितेश जेनेलियाला म्हणतोय 'धुवून टाक' (व्हिडिओ)

रविवार, 2 डिसेंबर 2018

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत.

मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात आपल्याला रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुखची धम्माल केमेस्ट्री पहायला मिळत आहे. जवळपास साडेतीन मिनिटाच्या या गाण्यामध्ये रितेश आणि जिनिलीयाची जबरदस्त धम्माल दाखवण्यात आली आहे. होळीच्या सणावर रंग खेळताना हे गाणे चित्रीत केल्याचे दिसत आहे.
 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

एकूण या गाण्याचे बोल 'आली होळीच्या दिसाला दुपाराला, कुठं निघाली तु आज बाजाराला ! ज़रा पिरमानं वाग माझा लयभारी स्वॅग तुझ्या लवरचा टॅग मला धुवून टाक ! आता कश्शाचा राग, हा तर रंगाचा डाग तुझ्या साडीला सर्फ लावुन धुवून टाक ! अशा प्रकारचे सोशल मिडीयावर आधारलेले बोल या गाण्यात घेण्यात आलेले आहेत. 

दरम्यान, 14 डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'मुंबई फिल्म कंपनी' आणि 'हिंदुस्तान टॉकीज'च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे. या चित्रपटाची निर्मीती रितेश देशमुखची पत्नी जिनिलीया देशमुख यांची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riteish Deshmukh Marathi Movie Mauli New Song Released