रितेश देशमुखने आईच्या जुन्या साडीपासून बनवले खास दिवाळीसाठी कपडे, व्हिडिओ व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे
Sunday, 15 November 2020

यंदाच्या दिवाळीत बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखने एक हटके काम केलंय. त्याची ही आयडियाची कल्पना सोशल मिडियावर चांगलीच हिट ठरतेय.

मुंबई- बॉलीवूड स्टार्स सोशल मिडियावर चाहत्यांना वेगवेगळ्या अंदाजाच दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. या सोबतंच बरेचजण त्यांचे पारंपारिक पेहरावातले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. मात्र यंदाच्या दिवाळीत बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखने एक हटके काम केलंय. त्याची ही आयडियाची कल्पना सोशल मिडियावर चांगलीच हिट ठरतेय.

हे ही वाचा: इरा खानने आई-वडिलांसह किरण रावकडे केला होता नैराश्याबाबत खुलासा, असा मिळाला सल्ला..

अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या दोन्ही मुलांसोबत दिसतोय. विशेष म्हणजे तिघांनी एकाच रंगाचा आणि डिझाईनचा कुर्ता पायजमा परिधान केलाय. याची खासियत म्हणजे हे कपडे नवीन नसून जुन्या साडीपासून बनलेले कपडे आहेत. याबाबतची माहिती स्वतः रितेश देशमुखने दिली आहे.

रितेशने सांगितलंय की त्याने त्याचा स्वतःचा आणि दोन्ही मुलांचा कुर्ता पायजमा आईच्या जुन्या साडीपासून बनवला आहे. रितेशच्या या कार्याचं सोशल मिडियावर अनेकजण कौतुक करत आहेत. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया गेल्या अनेक दिवसांपासून अशी कामं करत आहेत ज्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप बसतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

काही महिन्यांपूर्वीच दोघांनी शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला होता. आता दोघे सैंद्रिय शेती देखील करत आहेत. जेनेलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी कपल बॉलीवूडच्या बेस्ट कपलपैकी एक मानलं जातं.   

riteish deshmukh recycles his mother old saree for diwali clothes for kids  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: riteish deshmukh recycles his mother old saree for diwali clothes for kids