इरा खानने आई-वडिलांसह किरण रावकडे केला होता नैराश्याबाबत खुलासा, असा मिळाला सल्ला..

ira khan
ira khan

मुंबई- बॉलीवूड परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच तिने एक व्हिडिओ पोस्ट तिच्या नैराश्याबाबतचा खुलासा केल्याने ती चर्चेत आली होती. तिने नैराश्याबाबत केलेला खुलासा पाहुन सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. आता इराने नवीन खुलासा करत सांगितलंय की तिला तिच्या आई-वडिलांनी याबाबत नेमका काय सल्ला दिला होता ते.

आमिरची मुलगी ईरा खान सांगते की लोक त्यांचं नैराश्य त्यांच्यानुसार दाखवतात. हेच कारण आहे की तो उपाय त्यांना लागु पडतो मात्र तो समोरच्यावर तसा लागू होत नाही. अनेकजणांनी इराला सल्ला दिला की तिला सकारात्मक राहण्याची गरज आहे. वर्कआऊट करण्याची गरज आहे आणि सतत बिझी राहिलं पाहिजे. चार डॉक्टरांना दाखवल्यानंतर तिला समजलं की सतत बिझी राहणं हा यावरचा उपाय नाही. इराने तिच्या नैराश्याबाबत तिचे आई-वडिल रिना दत्त आणि आमिर खानला सांगितलं होतं सोबतंच तिने आमिरची पत्नी किरण रावसोबत देखील ही गोष्ट शेअर केली होती. 

इराने खुलासा केला की ''किरण आंटीने मला सांगितलं होतं की सतत बिझी राहणं बंद कर. सतत एका जागेवरुन दुस-या जागेवर उड्या मारु नकोस. हळूहळू पाऊल टाक.'' इरा पुढे सांगते की, लोक सांगतात सकारात्मक राहा. मी कधी हे ट्राय नाही केलं. कारण असं वाटतं की त्यांना तु सतत काहीतरी करत राहा असं सांगायचं असतं. मात्र हे होऊ शकत नाही.  व्हिडिओ शेअर करत तिने म्हटलंय, ''तुम्ही त्या व्यक्तिला काय सांगाल जे नैराश्याने ग्रस्त आहेत आणि तुम्हाला त्यांच्या नैराश्याचं कारण माहित नसेल. तर तुम्ही काय सांगाल? किंवा काय सांगणार नाहीत?''    

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

aamir khan daughter ira khan reveals when she told to parents her depression  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com