esakal | 'देवा, घडाळ्याचे काटे पुन्हा मागे फिरव'; वडिलांसाठी रितेश भावूक
sakal

बोलून बातमी शोधा

riteish deshmukh

'देवा, घडाळ्याचे काटे पुन्हा मागे फिरव'; वडिलांसाठी रितेश भावूक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh यांची आज (२६ मे) जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने Riteish Deshmukh सोशल मीडियावर फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. वडिलांसोबतचा हा रितेशच्या बालपणीचा फोटो आहे. यामध्ये विलासराव देशमुख यांच्याबाजूला रितेश आणि त्याचा भाऊ दिसत आहे. 'देवा, घडाळ्याचे काटे पुन्हा मागे फिरव, बाबा तुमची रोज खूप आठवण येते', अशा शब्दांत रितेशने भावना व्यक्त केल्या. (riteish deshmukh remembers late vilasrao deshmukh on his birth anniversary)

विलासराव यांची सून आणि रितेशची पत्नी जेनेलया हिनेसुद्धा तिच्या लग्नातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. विलासराव देशमुख यांना मिठी मारतानाचा हा फोटो आहे. 'बापलेकीची ही मिठी कायम लक्षात राहील', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

विलासराव यांचा सरपंच ते मुख्यमंत्री हा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. रितेशने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच राज्यातील आदर्श नेत्यात गणले जाणारे दिवंगत विलासराव देशमुख यांचा सुपुत्र असल्याचं माझं भाग्य असल्याचं रितेशने एका मुलाखतीत म्हटलं होतं.