#bottlecapchallange : तुम्हीही करून बघा अक्षय कुमारचे हे नवीन चॅलेंज!

टीम ईसकाळ
Thursday, 4 July 2019

अक्षय कुमारने स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, मी माझ्या अॅक्शन आयडॉल जेसन स्टॅथमपासून प्रेरित होऊन हा चॅलेंज स्विकारला आहे. 

मुंबई : एकमेकांना चॅलेंज देत ती पूर्ण करण्याचा एक ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये सुरू झालाय. यापूर्वी #10YearsChallenge, #KikiChallenge, #FitnessChallenge अशा काही पॉप्युलर चॅलेंजेसनंतर आता #bottlecapchallange सुरू झालाय. परदेशातून आलेले हे चॅलेंज भारतात सर्वात प्रथम अक्षय कुमारने केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

अभिनेता रितेश देशमुखने अक्षयचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत एक विनोदी कॅप्शन दिले आहे. 'हा माझा #bottlecapchallange असून मी अक्षय कुमारचा मास्क घातला आहे. तो या व्हिडिओवर दावा करू शकतो, पण तो माझा चांगला मित्र असल्याने मी त्याला काही बोलणार नाही. मी आता पुढील चॅलेंज अभिनेता टायगर श्रॉफला देत आहे.' 

तर अक्षय कुमारने स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, मी माझ्या अॅक्शन आयडॉल जेसन स्टॅथमपासून प्रेरित होऊन हा चॅलेंज स्विकारला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riteish Deshmukh retweets Akshay Kumar s bottle cap challenge