लॉकडाऊनमध्ये रितेश देशमुख बनला खलनायक..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

आरश्यावरची धूळ साफ करत अभिनेता रितेश देशमुखने त्याचा लूकंच बदलून टाकला आहे आणि आता तो खलनायक बनला आहे.

मुंबई- लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत. या काळात ते घरी बसून काय करत आहे त्याचा व्हिडिओ देखील सोशल साईट्सवर चाहत्यांसाठी शेअर करत असतात. या सगळ्यात सध्या जर व्हिडिओ बनवून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असेल तर तो म्हणजे अभिनेता रितेश देशमुख. रितेशचे टिकटॉक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत प्रेक्षक त्याच्या या व्हिडिओंना चांगलीच पसंती देत आहेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात रितेश खलनायक बनलाय. 

हे ही वाचा: अभिनेता सुनील शेट्टीने सांगितलं 'हेरा फेरी ३' रखडल्याचं खरं कारण..

आरश्यावरची धूळ साफ करत अभिनेता रितेश देशमुखने त्याचा लूकंच बदलून टाकला आहे आणि आता तो खलनायक बनला आहे. रितेशने त्याचा हा व्हिडिओ सोशल साईटवर पोस्ट केला आहे. रितेशने त्याच्या एक टिकटॉक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये तो आरश्यावर जमा झालेली धूळ साफ करताना दिसत आहे. 

रितेश देशमुखने शेअर केलेल्या त्याच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये बॅग्राऊंडला संजय दत्त, जॅकी श्रॉफ, माधुरी दिक्षीत स्टारर 'खलनायक' सिनेमातील प्रसिद्ध गाणं नायक नही खलनायक हूं में हे गाणं वाजतंय. आणि या गाण्यासोबतंच रितेश दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसून येतोय. तसं पाहायला गेलं तर रिेतेश देशमुख धमाल आणि हाऊसफुल सिनेमांच्या सिरीजमध्ये त्याच्या कॉमेडी अंदाजासाठी ओळखला जातो. मात्र खलनायक भूमिकाही त्याने उत्तमरित्या पार पाडल्या आहेत.२०१४ मध्ये रिलीज झालेल्या एक व्हिलन आणि गेल्या वर्षी रिलीज झालेल्या मरजावा या सिनेमामध्ये रितेश त्याच खलनायक रुप दाखवण्यात यशस्वी झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Main Hoon Khalnayak .... #magicmirror designer: @thecrankhead

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

या व्हिडिओमधील नायकवाल्या लूकमध्ये रितेश त्याच्या केसांसहित दिसतोय तर खलनायक लूकमध्ये त्याच्या डोक्यावरचे केस गायब होताना दिसतायेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना रितेशने लिहिलंय, मै हुं खलनायक.  रितेशचा हा खलनायक लूक प्रेक्षकांना चांगलाच आवडलाय. रितेश नेहमीच त्याच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असतो. काहीद दिवसांपूर्वी त्याच्या पांढ-या केसांचा लूकसुद्धा चर्चेत होता.   

riteish deshmukh turns khalnayak amid the lockdown during cleaning mirror


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: riteish deshmukh turns khalnayak amid the lockdown during cleaning mirror