esakal | 'व्हॅलेटाईन डे'निमित्त रितेश-जेनेलिया घेणार 'या' राजकीय जोडप्याची मुलाखत
sakal

बोलून बातमी शोधा

Riteish Genelia Deshmukh will take interview of Ashok and Amita Chavan

'कपल गोल्स' अनेक जोडपी या दोघांना आदर्श कपल मानतात. अशातच हे दोघं पुन्हा एकदा चर्चेत आलेत! इतर वेळी चित्रपटांत हिरो-हिरोईनच्या भूमिकेत असलेले रितेश आणि जेनेलिया आता मुलाखतकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत! आणि विशेष म्हणजे एका राजकीय क्षेत्रातल्याच बड्या जोडप्याची मुलाखत घेताना दिसणार आहेत. 

'व्हॅलेटाईन डे'निमित्त रितेश-जेनेलिया घेणार 'या' राजकीय जोडप्याची मुलाखत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बॉलिवूडमधलं क्यूट कपल रितेश जेनेलिया सतत काही ना काही गोष्टींमध्ये सक्रीय असतात. दोघं सोशल मीडियावरही नेहमीच फोटो, टिकटॉक व्हिडिओ पोस्ट करताना दिसतात. 'कपल गोल्स' अनेक जोडपी या दोघांना आदर्श कपल मानतात. अशातच हे दोघं पुन्हा एकदा चर्चेत आलेत! इतर वेळी चित्रपटांत हिरो-हिरोईनच्या भूमिकेत असलेले रितेश आणि जेनेलिया आता मुलाखतकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत! आणि विशेष म्हणजे एका राजकीय क्षेत्रातल्याच बड्या जोडप्याची मुलाखत घेताना दिसणार आहेत. 

राणा दग्गुबतीने शेअर केला 'हाथी मेरे साथी' चा टीजर

वडिल व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या घराण्यालाच राजकीय पार्श्वभूमी, घरात दोन आमदार भाऊ अशातच रितेशला एका राजकीय क्षेत्रातील पती-पत्नीची मुलाखत घेण्याची संधी मिळाली, तर ती तो कसा सोडेल... तर नांदेडमध्ये आयोजित 'आनंदाचे डोही' या कार्यक्रमात 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने रितेश व त्याची पत्नी जेनेलिया चक्क काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. ही मुलाखत खास ठरणार आहे कारण चव्हाण दाम्पत्याची मुलाखत चक्क रितेश-जेनेलिया घेणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने अशोक व अमिता चव्हाण यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. हा मुलाखतीचा कार्यक्रम १४ फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणावर घेण्यात येणार आहे. 

या मुलाखतीत रितेश-जेनेलिया चव्हाण दाम्पत्याला हलके-फुलके आणि कौटुंबिक प्रश्न विचारतील. यातून अनेक मजेशीर आणि छान उत्तर मिळतील.