Riva Arora Troll: ट्रोल झाल्यानतंर रिवाने दिले ट्रोल्सला सडेतोड उत्तर...म्हणाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Riva Arora Troll

Riva Arora Troll: ट्रोल झाल्यानतंर रिवाने दिले ट्रोल्सला सडेतोड उत्तर...म्हणाली

'उरी','गुंजन सक्सेना', 'भारत' आणि 'बंदिश बैंडिट्स'  यांसारख्या चित्रपटात काम करुन लहान वयातच प्रसिद्धिच्या झोतात आलेली रिवा अरोरा सध्या फार चर्चेत आहे. ती वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. रीवाने लहान वयातच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचं करण कुंद्रा आणि गायक मिका सिंगसोबतचा रोमँटिक व्हिडिओ. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर रिवाला ट्रोलचा सामना करावा लागला. तिच्या विरोधात बोलले गेले तसेच काही मीम्सही व्हायरल झाले. आता रियाने एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना उत्तर दिलयं.

ट्रोल झाल्यावर रिवाने इंस्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटत तिने क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान केले आहे. या फोटोत ती मिरर सेल्फी घेत आहे. या फोटोत ती खुपच हॉट दिसतेय. हा फोटो सोशल मिडीआवर टाकण्याचा उद्देश हा तिच्या कॅप्शनमधून कळतोयं. या फोटोंच्या माध्यमातून रिवाने तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की 'तिरस्कार हा तुम्हाला  मिळू शकणारी सर्वोत्तम प्रशंसा आहे.' या छोट्या कॅप्शनद्वारे, रिवाने ट्रोलर्सना सांगितले की त्यांनी दिलेली ईर्ष्या देखील प्रशंसा म्हणून घेते आणि तिला ट्रोल्सचा काही फरक पडत नाही. ती त्याचा जास्त विचारही करत नाही.

हेही वाचा: Karan kundra: असं काय केलं करणने की नेटकऱ्यांनी त्यांची लाजच काढली?

मागील काही दिवसांपासून करण कुंद्रासोबतचा रीवाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिचा मिका सिंगसोबतचा व्हिडिओही व्हायरल झाला. याव्हिडिओमध्ये रीवा मिका सिंगसोबत डान्स करताना दिसत आहे. 12 वर्षांच्या रीवाचा  45 वर्षीय मिका सिंग आणि  आणि 38 वर्षीय करणसोबतचा तिचा डान्स युजर्सना आवडला नाही. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत डान्स करणे, मिकाला आणि करणला शोभणारे नाही असं म्हणत लोकांनी त्या दोघांची पार लाजच काढली. त्याच बरोबर लोकांनी रीवाच्या आई-वडिलांनाही धारेवर धरंल होतं. पैशांसाठी मुलीकडून काहीही कसं करुन घेऊ शकतात अशी टिका त्यांच्यावर करण्यात आली.

हेही वाचा: Rakul Preet Singh: 'मला कमी वेळात लांबचा पल्ला गाठायचा होता' म्हणून...